
नाथाभाऊनी आपल्या पक्षाची ४० वर्ष सेवा केली. अनेकांना मोठं केलं. संघटन वाढवलं. या काळात हा नेता अतिशय पॉवरफुल होता. आता मात्र हा नेता ऑफरफुल झाला आहे. विविध राजकीय पक्षातून नाथाभाऊंना आपल्या पक्षात येण्याच्या ऑफर मिळत आहेत. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसमध्ये ये ण्यासाठी ऑफर दिली आहे. विधानसभेत उमेदवारी नाकारल्यानंतर खडसे पक्षाबाबत निर्णय घेण्याच्या तयारीत होते. विधानसभा निकालानंतर त्यांनी पक्षांतरांच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेवून चाचपणीही केली होती. मात्र त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला नाही. मात्र आता विधानपरिदेतही पक्षाने न्याय न दिल्याने ते पक्षातून बाहेर पडण्याच्या निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र "कोरोना'चे सावट कमी झाल्यानंतरच त्यांना निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नाथाभाऊंनी राज्यातील पक्षनेतृत्वाशी सरळसरळ बंड पुकारले असून राज्यात नव्हेतर चक्क दिल्लीत जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणातील बड्या नेत्यांशी जवळकी साधली आहे. आता नाथाभाऊ स्वत: बाहेर पडणार की भाजपला महाराष्ट्रातील सत्तेतून कायमचे बाहेर ठेवणार याचीच सर्वांना प्रतीक्षा आहे. त्यांना थेट कराचीतून दाऊद इब्राहीमने फोन केल्याची खळबळजनक बातमी, पुण्यानजीक भोसरी या औद्योगिक नगरीमध्ये करोडो रुपयांचा भूखंड खडसे यांनी आप्तस्वकियांच्या नावाने बळकावल्याचा धक्कादायक आरोप,या घटनांनी नाथाभाऊ अडचणीत आले. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे इतक्या गाळात जाऊन रुतले की पक्षालाही त्यांची पाठराखण करणे अशक्य झाले. त्यानंतर ते पक्षात मागे पडले. अधूनमधून आपल्या अस्तित्वाची जाणीव खडसे करून देत राहिले असले तरी त्यांच्याकडे पक्ष नेतृत्त्वाने सरळसरळ दुर्लक्ष केले होते.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी वारंवार बंडाचा इशारा देऊनही पक्षनेतृत्त्वाने त्यांची दखल घेतली नाही. त्यांना विधानसभेचे तिकीट दिले नाही. त्यामुळे खडसे अधिकच नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने त्यांना नाही पण त्यांची मुलगी रोहिणी यांना विधानसभेचे तिकीट दिले. पण, त्याही निवडून येऊ शकल्या नाहीत. आता पक्षांतर्गत बंडखोरी करून आपल्या मुलीला पाडण्यात आले असा आरोप खडसे यांनी केला. सध्या ते पक्षही सोडायला तयार आहेत. पक्ष सोडून मात्र ते जाणार कुठे तर शिवसेनेत जाणार असे म्हटले जाते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्यावतीने कळवळा दाखवत खडसे आमचे जुने स्नेही आहेत असे म्हटले आहे.महाराष्ट्राला राजकिय बंड काही नविन नाही.
शरद पवारांनी कॉंग्रेसविरुध्द दोन वेळा केलेल,भुजबळांनी सेनेविरुध्द केलेल,विलासराव व सुशिलकुमारांनी पवारांविरुध्द केलेल,राणेंनी व राजनी उध्दवविरुध्द केलेल, अस प्रत्येक राजकिय बंड महाराष्ट्राची राजकिय भुमी हादरवुन गेल. छगन भुजबळ, नारायण राणेंनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरुध्द केलेल. गोपिनाथ मुंडेंनी गडकरींच्या 'किचन कॅबिनेट'विरुध्द केलेल बंड येत. तसेच गेल्या काही महिन्यात दत्ता मेघेंच,कर्नल सुधिर सावंतांच,वैभव नाईकांच बंडही झाले. राजकारणात काहीच अंतिम नसते. परिस्थितीनुसार तत्वे, आदर्श बदलत असतात त्यामुळे खडसे हे काही मुलाखावेगळे करत आहेत असेही नाही. आपले राजकीय वजन कमी होउ नये म्हणुन खडसे पाउल उचलत आहेत. विधानपरिषदेत उमेदवारी नाकारल्यानंतर खडसे पक्षाबाबत निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
नाथाभाऊनी ग्रामपचांयत सदस्यपदापासून सुरू केलेल्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यात बळकट केलेच. मात्र स्वत:च्या कार्याचा ठसा उमटवित त्यांनी राज्यातील पदे मिळविली. सन 1998 मध्ये युतीच्या सरकारमध्ये अर्थमंत्रीपद झाले. तर सन 2008 ते 20015 या कालावधीत त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषवलं. धडाकेबाज विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी आपला नावलौकिक वाढवला. याकाळात त्यानी सत्ताधारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसवर विधीमंडळ व विधीमंडळाच्या बाहेरही जोरदार हल्ला करून भाजपची जनतेत एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. पॉवरफुल नेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. सध्या राजकारणात दोनच गोष्टींची सर्वाधिक चर्चा आहे. एक म्हणजे भाजप आणि दुसरे भाजपचे नेते एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊ. दिल्ली असो की महाराष्ट्राची गल्ली, भाजप आणि नाथाभाऊंनी प्रत्येकाला चर्चेचा विषय झाला आहे.
नाथाभाऊ काल आज आणि उद्या व्हाया महाराष्ट्र भाजप ते दिल्ली
ReplyDelete