Friday, May 20, 2022

साहस, संयम, संघर्ष म्हणजे ''रोहित''


पुण्यातील एका मित्राच्या घरी  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित (दादा) पाटील यांची भेट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी दिवंगत नेते रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील उर्फ आबा यांचा रोहित हा मुलगा 

 8 नोव्हेंबर 2014 रोजी आर. आर.पाटील यांचं निधन झालं. त्यांची राजकीय कारकीर्द मोठी होती. जिल्हा परिषद सदस्य ते सहा वेळा आमदार, ग्रामविकासमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री ते अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर रोहित पाटील यांच्याकडे  पक्षाकडून स्वतंत्र राजकीय जबाबदारी देण्यात  आली आहे.

आबांनी कामातून नावलौकिक मिळवला. सर्वसामान्य माणसाची नाळ आबांच्याबरोबर कायम जोडलेली राहिली. एवढा मोठा वारसा घेऊन रोहित त्याच वाटेने पुढे चालत आहे. शिक्षण चालू असतानाच आपल्या वडिलांचे निधन होणे.  ते दुःख पचवत जनतेचे प्रश्न सोडवत राहणं किती कठीण असते. हे तेच सांगू शकतात. कॉलेज विषयाच्या गप्पा झाल्यानंतर मतदारसंघातील विविध विषयावर चर्चा झाली. मतदारसंघातील विविध प्रश्नांची खडानखडा माहिती रोहितला आहे.  तासगाव परिसरात द्राक्षचे मोठे उत्पादन घेण्यात येते. दहा हजार पेक्षा जास्त हेक्टरवर द्राक्षे पिकवली जातात. या द्राक्षाला आता जगाची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

 आमचा शेतकरी किती मेहनती आहे हे रोहित अतिशय अभिमानाने सांगतो. आबांचे आणि सर्वसामान्य शेतकरी माणसाचं नातं असंच होतं. गावातील प्रत्येक माणसाला आबा आपला माणूस वाटत होते. आबा भाषण करायला आल्यानंतर आपल सगळं दुःख आबाला माहित आहे याची जाणीव भाषण ऐकणाऱ्या प्रत्येक माणसाला होत होती. रोहितच देखील सेम आबांसारख आहे.  रोहित बोलत राहावा आणि आपण ऐकत राहावे. अशीच भावना आपली होते. कवठेमहाकाळच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी रोहितवर बापाची पुण्याई असल्याचा आरोप केला होता. निवडणुकीनंतर तुम्हाला माझा बाप आठवलं असे ठणकावून सांगणारा रोहित खूप संयमी आहे. रोहित पाटील सोशल मीडियावर सुद्धा सक्रिया असतात.

 इन्स्टाग्रामवर त्यांचे 83 हजार फॉलोअर्स आहेत. तर ट्वीटरवर त्यांचे 32 हजार फॉलोअर्स आहेत. त्यांचं वय कमी असेल त्यामुळे गेल्यावेळी त्यांना संधी दिली नसेल. रोहित हा लोकांमधील युवा कार्यकर्ता आहे. रोहित जनतेत मिसळणारा कार्यकर्ता आहे.  घराणेशाही नाही तर रोहितच कर्तुत्वच त्याला महाराष्ट्राचा नेता बनवेल.