Saturday, April 23, 2022

महाराष्ट्राच्या समृद्धीचा राजमार्ग

 


महाराष्ट्र विकास महामंडळ राज्य मार्ग (MSRDC) नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी अवघ्या दोन अडीच वर्षातच सज्ज झाला. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम यांचा समावेश आहे. विदर्भाला बहुसंख्य ठिकाणी अत्यंत वेगवान प्रवासाचा पर्याय प्रथमच मिळाला. 
नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार हा 210 किमीचा रस्ता तयार झाला. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे दोन मे रोजी उद्घाटन होणे हे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल. 

अनेकदा जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करताना वाहने संथ गतीने चालवली जातात. कोणताही वन्य प्राणी रस्त्यावर आला तर त्याला कोणतीही हानी होऊ नये असा हेतू  असतो. पण आता देशात असा हाय-स्पीड हायवे बनवला जात आहे, ज्यामध्ये वनक्षेत्राजवळ अंडरपास आणि पूल बांधले जातील. जेणेकरून वन्य प्राणी इकडून तिकडे जाऊ शकतील. भारतात हे पहिल्यांदाच घडत आहे.

हा देशातील पहिला सर्वात वेगवान महामार्ग असेल. नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे असे त्याचे सुरुवातीला तांत्रिक नाव होते. ताशी 150 किमी वेगाने वाहने धावू शकतील अशा पद्धतीने ते तयार केले जात आहे. 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' असे नामकरण झालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट मुंबई आणि नागपूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी करण्याचे आहे. सध्या, दोन शहरांमधील प्रवासाची वेळ  16-18 तासांच्या दरम्यान आहे.

55,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे 70 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. सुमारे 701 किमी लांबीचा आणि 120 मीटर रुंद असलेला हा महामार्ग आहे. जानेवारी 2019 मध्ये बांधकामाला सुरुवात झाली. नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार हा 210 किलोमीटरचा रस्ता पहिल्या टप्प्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. एमएसआरडीसीने नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजारापर्यंत 210 किमी महामार्ग वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

 त्यानंतर डिसेंबरअखेर नागपूर ते शिर्डी हा 520  किलोमीटरचा महामार्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडीसीला  एक्स्प्रेस वेच्या बाजूने हिरवळ निर्माण करावी त्यामुळे लोकांना प्रवासाचा आनंद घेता येईल, अशा सुचना दिल्या. कलासक्त मनाच्या मुख्यमंत्र्यांची ही सुचना निसर्ग संवर्धनासाठी आणि प्रवाशांना हिरवाईचा अनुभव मिळावा यासाठी महत्त्वाची. 

अनेकदा जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करताना वाहने संथ गतीने चालवली जातात. जेणेकरून कोणताही वन्य प्राणी रस्त्यावर आला तर त्याला कोणतीही हानी होऊ नये. पण आता देशात असा हाय-स्पीड हायवे बनवला जात आहे, ज्यामध्ये वनक्षेत्राजवळ अंडरपास आणि पूल बांधले जातील. जेणेकरून वन्य प्राणी इकडून तिकडे जाऊ शकतील. भारतात हे पहिल्यांदाच घडत आहे.

तीन अभयारण्यांकडे जाण्यासाठी सुध्दा या समृद्धी महामार्गावरुन रस्ता मिळेल. यामध्ये तानसा (ठाणे), काटेपूर्णा (अकोला-वाशिम सीमा) आणि कारंजा सोहोळ (वाशिम) यांचा समावेश आहे. याशिवाय या मार्गावर 35 वन्यजीव फोकस क्षेत्रे असतील. त्यापैकी 16 विदर्भात, 16 उत्तर पश्चिम घाटात आणि 3 मराठवाड्यात असतील. ते सुमारे 118 किमीच्या अंतरात असतील. 

महामार्गाच्या बांधकामामुळे वन्य प्राण्यांचे जनजीवनही विस्कळीत झाले. त्यांना पूर्वीसारखे फिरता येत नाही. अशा परिस्थितीत या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने भारतीय वन्यजीव संस्थेशी समन्वय केला. या अंतर्गत वन्य प्राण्यांना भीती न वाटता किंवा जीव धोक्यात न घालता रस्त्यावरून फिरता यावे हा उद्देश आहे. या एक्स्प्रेस वेमध्ये 'वाइल्डलाइफ फोकस एरिया'  अंतर्गत पाच वन्यजीव पूल, विदर्भात तीन ओव्हरपास आणि औरंगाबादमध्ये दोन ओव्हरपास बांधले जातील. 

या महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्यातील 520 पैकी 360 किमीचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याची 'एमएसआरडीसी'ची योजना होती. मात्र, सेलूबाजार ते शिर्डीमधील काही पुलांची कामे अद्याप अपूर्ण राहिली. दोन पॅकेजमधील कंत्राटदार बदलण्याची वेळही 'एमएसआरडीसी'वर आली. परिणामी, पहिल्या टप्प्यात नागपूर ते सेलूबाजारपर्यंतचाच टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नंतर डिसेंबरपर्यंत नागपूर ते शिर्डी असा 520 किमीचा महामार्ग सुरू होईल.

Tuesday, April 19, 2022

कोल्हापूरला सहानुभूतीचे पारडे जड



महाविकास आघाडी सरकार व भाजपातील सत्तासंघर्ष पराकोटीचा झालाय. अशा परिस्थितीत कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीचाही महाराष्ट्रभर गाजावाजा झाला. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यांच्या प्रदेश अध्यक्षांच्या, चंद्रकांत पाटलांच्या प्रभावाचा, यश अपयशाचा मुद्दा यामागे होता. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. त्यांच्या पत्नी, भाजपाच्या माजी नगरसेविका जयश्री जाधव यांना बिनविरोध निवडून देण्याचे आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे होते. महाविकास आघाडीतील ठळक जाणवणारा समन्वय, जनतेच्या मनातील दिवंगत नेत्याबद्दलची समंजस सहानुभूती, आणि या मतदारसंघात जिवंत असलेला पुरोगामी काॅंग्रेस विचार यामुळे भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. 

विद्यमान आमदाराचे निधन झाले, आणि त्याच्या पत्नीने पतीचा पक्ष सोडत पक्ष बदल करत निवडणूक लढवली, तर यश मिळत नाही, इतके मतदार पक्के असतात, हे यापूर्वी खडकवासला सारख्या काही पोटनिवडणुकांत दिसून आले होते. कोल्हापूर मध्ये ६० टक्के मतदान झाले. त्यात विविध विचारांची मते असली तरी सहानुभूतीचे पारडे जड झाले हे नाकारता येणार नाही. 

 शिवसेनेने गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना पुन्हा उमेदवारी न देता काँग्रेसला पाठिंबा दिला. महाविकास आघाडी धर्माचे पालन केले. जाधव यांना ९६१७६ तर कदम यांना ७७,४२६ मते मिळाली. १८,७५० मतांची आघाडी महाविकास आघाडीला मोठे बळ देणारी ठरली. विशेषतः केंद्रीय तपास यंत्रणेचे आघाडीच्या नेत्यांवरचे संशय गडद करणारे, छापे व धाडसत्र ,कारवाईचा विळखा असताना हे यश तिन्ही पक्षांच्या ताकदीमुळे व 'शाहू नगरी'तील जनतेच्या मनातील सहानुभूतीमुळे मिळाले. 

भाजपने या निवडणुकीत हिंदूत्वाचा मुद्दा उचलून धरला होता. तर महाविकास आघाडीने शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार या निवडणुकीत विजय मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला होता. महाविकास आघाडीतील सर्वच जेष्ठ नेते तसेच युवा नेतेही प्रचारासाठी कोल्हापुरात होते. तसेच भाजपच्या बाजूने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात तळ ठोकून होते. 

 प्रचारासाठी बाहेरुन लोक आणले अशी टीका भाजपवर झाली. त्यावर चंद्रकांत पाटलांचे ' आमचे कुटुंब आहे कोणाच्याही घरी लग्न असले तरी आम्ही जातो.' हे उदगार काहीही झाले तरी ही लढत जिंकायची ही जिद्द दाखवून देणारे होते. २०१४ च्या निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार  व महादेवराव महाडिक यांचे नातेवाईक सत्यजित कदम यांना 'आयात' करून रिंगणात आणत भाजपने शर्थीचे प्रयत्न केले. रिपाइं, जनसुराज्य, सदाभाऊ खोत यांचा रयत पक्ष, गोपिचंद पडळकर यांचा समाज, शिवसंग्राम, आवाडे गट, महाडिक गट यांच्या खास मतांवरही भाजपची मदार होती. 

एखाद्या सदस्याचे जर निधन झाले तर त्या जागेवर होणारी निवडणूक बिनविरोध होते, अशी महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. येथे तसे झाले नाही अशी टीका महाविकास आघाडीतील नेते करत होते. तर आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्दयांवर लढली. पूर परिस्थिती, विमानतळ विस्तारीकरण हे विकासाचे मुद्दे असल्याचे चंद्रकांत पाटील सांगत होते. 

 पहिल्या फेरीपासून जयश्री पाटील यांना मिळालेली आघाडी पाहून अखेरीस पाटील यांनी पराभव मान्य केला. भाजपचे दोन खासदार होते, आता भारतभर आमचा पक्ष पसरला हे समाधान ( पराभव झाल्यानंतर भाजपकडून नेहमी व्यक्त होणारे) देखील व्यक्त केले.) 
 विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सहानुभूतीमुळे जयश्री जाधव यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

 कोल्हापूरचे पालकमंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील  'किंगमेकर' ठरले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व सेनेच्या नेत्यांना सोबत घेत चंद्रकांत पाटील यांना व महाडिक परिवाराला  शह दिला. कोल्हापुरात महाविकास आघाडीत मोठा समन्वय असल्याने हा विजय शक्य झाला, असे सतेज पाटलांचे म्हणणे आहे. 

सतेज पाटील  यांनी रचलेल्या व्यूहरचनेप्रमाणे आघाडीचे नेते उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नशील राहिले. तर हिंदुत्व, शिवसेनेचे संपवण्याचे उद्धव ठाकरेंचे प्रयत्न आणि गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्दा,यामुळे  भाजपाने निवडणूकीच्या प्रचार धार्मिक  मुद्याच्या वळणावर पोहचवला.

सतेज पाटलांची विजयानंतरची प्रतिक्रिया भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली हे मान्य करणारी आहे. ते म्हणतात, कोल्हापूर शहर पुरोगामी आहे हे दाखवून देण्याचे काम इथल्या नागरिकांनी केले. भाजपने विखारी प्रचार केला. ज्या प्रभागातून सर्वाधिक मतांची अपेक्षा होती तिथून आम्हाला कमी प्रतिसाद मिळाला. यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो यावर विचार करु. भाजपच्या मताचा टक्का वाढलेला सकृतदर्शनी दिसत असले तरी त्यात पुढे सातत्य राहणार नाही.

Friday, April 8, 2022

दिलवाले शहर का 'दिल भरा खाना'



प्रत्येक शहराची एक खाण्याची संस्कृती असते. तशी संस्कृती दिल्लीची देखील आहे. यमुनेच्या पाण्याची चव खाद्यसंस्कृती मध्ये पाहायला मिळते. दिल्लीमध्ये अनेक वेळा येणं-जाणं सुरू असतं. देशाची राजधानी दिल्ली आपले वेगळेपण सदैव असल्याचे चित्र पाहायला मिळते. महाराष्ट्र सदनच्या थाळी पासून ते कॅनॉट प्लेसच्या Sandoz पर्यंत, National पासून ते राजेंद्र दा धाबा ते बंगाली मार्केटपर्यंत, प्रेम ढाबा या ढाब्याचे बटर चिकन खूप प्रसिध्द आहे.

 इथले जेवण चविष्ट तसेच स्वस्त आहे आणि तुम्हाला इथे बसून खाण्याची सोयही मिळेल. विशेष बाब म्हणजे ते नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच आहे.राजिंदर दा ढाबा हे दिल्लीतील सर्वात जुन्या रेस्टॉरंटपैकी एक मानले जाते. त्याची नॉनव्हेज टेस्ट फक्त दिल्लीतच नाही तर भारताच्या अनेक भागात प्रसिद्ध आहे. तुम्हाला इथले बटर चिकन आवडेल. यासोबतच तुम्ही या ठिकाणी चिकन आणि मटणाचे इतर चविष्ट पदार्थ देखील ट्राय करू शकता.

गुलाटी रेस्टॉरंट हे दिल्लीच्या पंडारा रोड मार्केटमध्ये असलेल्या गुलाटी रेस्टॉरंटच्या बटर चिकनची गोष्ट खास आहे. असं म्हणतात की हे दुकान 1959 पासून सुरू आहे. येथील बटर चिकन खास असते. दरियागंज नाॅनव्हेडसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे अशी अनेक रेस्टॉरंट्स आहेत, जिथे तुम्ही बटर चिकनचा आस्वाद घेऊ शकता. हे ठिकाण राजेशाही थाटासाठीही ओळखले जाते.

दिल्लीच्या राजौरी गार्डन भागात 'ढाबा' हे एक खास रेस्टॉरंट आहे. तुम्ही इथे बटर चिकन आणि गार्लिक नॉन-टेस्ट देसी स्टाईलमध्ये ट्राय करू शकता. इथलं जेवण थोडं महाग आहे, पण चवीच्या बाबतीत या रेस्टॉरंट जोड नाही.
दिल्ली हाटमध्ये साबुदाणा वडा छान आहे, पण सोबत लसणीची चटणी देतात. बटाटेवडा पण ओके. बाकी थालपीठ, भाकरी, झुणका वैगरे तिथे खावं वाटलं नाही. कोकम सरबत मिळतं तिथे, ते मात्र ब्येस्ट.  बाकी आंध्राभवन मधले जेवण छान असते. व्हेज थाली मस्त आहे तिथली.. सोबत मेतकुटाचा भाऊ शोभेल असा एक पदार्थ येतो, 
नॉन व्हेज खात असाल तर तिथली चिकन चेट्टिनाड ही डीश खाच. जेवण झाल्यावर मस्त पान वैगरे मिळते. गुजराथी थाळीसाठी राजधानी, कॅनॉट प्लेस अन गुडगावमध्ये आहे..

 बहुतेक नोयडा मध्ये पण असेल. चांगलं जेवण अन चांगली सर्विस... अशीच एक सुरुची नावाची जागा आहे करोलबागमध्ये, तिथे गुजराथी अन राजस्थानी जेवण मिळतं... एकदम छान चव.. आहे. याव्यतिरिक्त रात्री बेरात्री उशिरा जेवायचं असेल तर पंडारा रोड चांगली जागा आहे. कढी चावल / राजमा चावल साठी कॅनॉट प्लेसवर रोडवर काके का ढाबा टाइपच्या एक्-दोन जागा आहेत. त्या पण चांगल्या आहेत.

दिगंबर दराडे
दिल्ली 7 एप्रिल 2022