Monday, February 21, 2022

रशिया युक्रेन आमने-सामने

 


भ्रमंती हा आवडीचा विषय असल्यामुळे  सुदैवाने युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांना भेट देण्याचा योग आला. दोन्ही देश प्रगतीने आणि निसर्ग संपत्तीने संपन्न आहेत. रशिया बलाडे तर युक्रेन हा अतिशय छोटा देश आहे. छोटा असला तरी या देशांनी आपले वेगळेपण जपले आहे.


 
७/०३/२०१७ ला युक्रेन तर   २९/०९/२०१८ रशियाला जायचा योग आला. या देशांमध्ये असलेल्या विद्यापीठांना भेटीही दिल्या. विशेष म्हणजे युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या प्रत्येक तरुणाला संशोधनासाठी एक बॉडी दिली जाते. तर हीच परिस्थिती भारतात वेगळी आहे. एमबीबीएसचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांच्यामागे एक बॉडी अभ्यासाकरिता देण्यात येते. या दोन्ही देशांच्या  प्रगतीचा विचार करता अनेक क्षेत्रात भरारी घेतलेली आहे. रस्ते, पाणी, वीज याच्या पलीकडे  इंटरनेटनेट, टेक्नॉलॉजी या  गोष्टींकडेही या देशाने गांभीर्याने पाहिले आहे.


युक्रेन हा रशियाचाच एकेकाळचा भाग असून त्यांच्यात अनेक सामाजिक, सांस्कृतिक तसंच आर्थिक संबंध खोलवर रुजलेले आहेत. सोव्हिएत युनियनमधून वेगळा झाल्यापासून रशिया (Russia) आणि युक्रेन(Ukraine) यांच्यात अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे. युक्रेन हा रशियाचाच भाग असून त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे मात्र अनेक रशियन हे स्वतंत्र अस्तित्व मान्य करत नाहीत. अशात युक्रेन आणि नाटो (NATO) देशांची जवळीक हा रशियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. युक्रेनला नाटोचं सदस्यत्व मिळण्याला रशियाचा तीव्र विरोध आहे. तसं झालं तर आशियातील रशियाचं महत्त्व कमी होणार, अशी भीती रशियाला आहे. त्यामुळे  हे दोन्ही देश एकमेकांच्या समोर आले आहेत.


युक्रेनवासीयांनी 2014 सालच्या आरंभी त्यांच्या रशियास्नेही राष्ट्राध्यक्षांना पायउतार व्हायला भाग पाडलं, तेव्हा रशियाने युक्रेनच्या दक्षिणेकडचा क्रिमियन द्विपकल्प भाग स्वतःच्या ताब्यात घेतला आणि युक्रेनच्या पूर्वेकील मोठ्या प्रांतावर ताबा घेतलेल्या फुटीरतावाद्यांना पाठिंबा दिला. या बंडखोरांची तेव्हापासून युक्रेनच्या सैन्याशी लढाई सुरू असून या संघर्षात 14 हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे.


नाटो व युरोपीय संघ या दोन्ही युरोपीय संस्थांशी होत असलेल्या युक्रेनच्या जवळिकीला रशियाने पूर्वीपासून विरोध दर्शवला आहे. तीस देशांची सुरक्षाविषयक आघाडी असणाऱ्या नाटोमध्ये युक्रेन सहभागी होणार नसल्याची हमी पाश्चात्त्य देशांनी द्यावी, अशी रशियाची मागणी आहे. युक्रेनच्या सीमा युरोपीय संघ व रशिया या दोघांनाही लागून आहेत, पण आधीच्या सोव्हिएत संघाचा भाग राहिलेल्या युक्रेनचे रशियाशी खोलवर सामाजिक व सांस्कृतिक संबंध आहेत, आणि रशियन भाषाही तिथे व्यापक स्तरावर बोलली जाते.  हे सर्व स्नेही बंद एकच असताना हे दोन्ही देश आता वेगळ्या उंबरठ्यावर आले आहेत.
@दिगंबर दराडे
१९ फ्रेब्रुवारी २०२२, पुणे