Thursday, December 29, 2022

होय सिंगापूरने जपलं वेगळपण

 सिंगापूर हा देश एका लहान बेटावर बसला आहे. सिंगापूर हे जरी एक लहान बेट असले तरी त्याची व्याप्ती जागतिक आहे. एखाद्या देशाला जागतिक स्तरावर जर एखादे यश संपादन करायचे असेल किंवा आपली ताकद सिद्ध करायची असेल तर त्या देशाचे आकारमान हे कधीच अडथळा ठरत नाही हे आपल्या सर्वांना या महान देशाने दाखवून दिले आहे.  पाचपन्नास वर्षांपूर्वीपर्यंत ज्या नदीच्या किनाऱ्यावर जहाजं, व्यापारी, हमाल, पाहुण्यांची गर्दी असायची, त्या नदीनेच नव्हे तर सिंगापूरनेच स्वतंत्र झाल्यानंतर कात टाकली आहे. एखादा देश आपलं व्यक्तिमत्त्व किती आमूलाग्र बदलू शकतो, हे समजून घ्यायचं तर सिंगापूरला भेट दिल्यानंतर आपल्या लक्षात येते.


सिंगापूर... आग्नेय आशियाच्या नकाशातला अगदी टिकलीएवढा छोटासा देश. शेजारच्या मलेशियाच्या आधाराने जगू पाहणारा... पण त्या देशाने झिडकारल्यानंतर हताश न होता अथक प्रयत्नांची कास धरणारा... त्या सिंगापूरने सर्वांगीण प्रगतीची जी गरूडभरारी घेतली, त्याचे वास्तव प साकम ?त्रकाराच्या नजरेतून  मांडताना  वेगळा अनुभव येत आहे.  हा देश उभारण्यामध्ये  प्रेरणा होती ली क्वान यू नावाच्या एका जिद्दी पण द्रष्ट्या नेत्याची. त्या नेत्याच्या अफाट कर्तबगारीची ..सिंगापूरच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेल्या पंतप्रधान ली क्वान यू यांची निर्णय घेण्याची पद्धत, तसेच सिंगापूरच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले उपाय. पहायला मिळतात. गरुडभरारी घेणाऱ्या सिंगापूरची आजची प्रगती कशी झाली, त्याचबरोबर किती कठोरपणाने तिथं कायदे राबविले जातात. हे पाहणे महत्त्वाचे आहे.



अनेक ठिकाणी थांबून संपूर्ण शहराचं दर्शन घेण्याची इच्छा असते. सिंगापूरमध्ये अशा विहंगदर्शनाची व्यवस्था वेगवेगळय़ा पद्धतीनं वेगवेगळय़ा ठिकाणी केलेली आहे. त्यातील एक आहे सिंगापूर फ्लायर. संथ गतीनं फिरणाऱ्या या अवाढव्य पाळण्यात बसून क्षितिजापर्यंतचा समुद्र न्याहाळता येतो आणि दूरवर पसरलेलं सिंगापूरही पाहता येतं. तासाभराच्या त्या आवर्तनात वेगवेगळय़ा उंचीवरून आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवता येतं.


मरिना बे सँड्स हे सिंगापूरमधील एक प्रतिष्ठित हॉटेल. ५६ मजल्यांच्या आणि तीन इमारतींच्या या हॉटेलच्या शिखरावर एक ऑब्झर्वेशन डेक तयार करण्यात आलेला असून, हॉटेलच्या कामकाजात व्यत्यय न आणता पर्यटकांना छप्पनाव्या मजल्यावर पोहोचता येतं. त्या डेकच्या एका बाजूला पसरलाय अथांग सागर तर दुसऱ्या बाजूला उभं आहे अख्खं सिंगापूर. सिंगापूर प्लायरपेक्षाही उंच असलेल्या डेकवरून मनसोक्त सिंगापूर पाहता येतं, न्याहाळता येतं. 

सिंगापूर नदीला अनेक शतकांचा इतिहास आहे. अगदी पाचपन्नास वर्षांपूर्वीपर्यंत याच नदीच्या किनाऱ्यावर जहाजं, व्यापारी, हमाल, पाहुण्यांची गर्दी असायची. त्या गर्दीत चीन, भारत आणि पश्चिम आशियातील लोकांचा भरणा अधिक होता. 


सिंगापूर स्वतंत्र झाल्यानंतर देशाच्या परिवर्तनानं वेग घेतला. १९८०च्या आसपास सिंगापूर नदीच्या कायापालटाच्या कामाला प्रारंभ झाला. दूषित पाणी आणि अस्वच्छ नदीकाठांची साफसफाई सुरू झाली. किनाऱ्यावर असलेली मालगुदामं आणि व्यापार इमारती पुरातन वास्तू म्हणून संरक्षित करण्यात आल्या. नदीच्या दोन्ही तीरांना जोडणाऱ्या जुन्या पुलाचं सुशोभीकरण करण्यात आलं. त्याच परिसरात नंतर उंचच उंच आधुनिक पद्धतीच्या इमारती उभ्या राहू लागल्या.


जुन्या-नव्या वास्तू-इमारतींनी तो भाग गजबजून गेला. सिंगापूर नदीचे काठ स्वच्छ झाले आणि पात्र नितळ! त्या पात्रातून आता बोटीनं फिरण्याची सोय करण्यात आली आहे.  आभाळ उंचीचं हॉटेल मरिना बे सँड्स. चहूबाजूच्या इमारती पाहताना सिंगापूरने केलेल्या प्रगतीचा झपाटा लक्षात येतो. शहर पाहायला आलेल्या पाहुण्यांना एखाद्या उंच ही. एखाद्या खासगी स्टार हॉटेलचा एखादा भाग असा लोकांसाठी उपलब्ध करून देणं ही गोष्टही दखल घेण्यासारखीच आहे. सिंगापूरच्या हार्बर फ्रंट या मेट्रो रेल्वे स्थानकावरून केबल कारने सेंटोसा बेटावर जाता येतं. संथ गतीनं समुद्र पार करणाऱ्या या पाळण्यात बसून सिंगापूर बंदर, सिंगापूर शहर आणि सेंटोसा बेटावरच्या वेगवेगळय़ा इमारती आणि वास्तू पाहता येतात. परिसराचं विहंग दर्शन घडावं या उद्देशानंच केबल कार खूप उंचीवरून नेली आहे. सेंटोसा बेटावर उतरताच सामोरा येतो टायगर स्काय टॉवर. ११० मीटर उंच असलेल्या या टॉवरमधून संपूर्ण सेंटोसा, सिंगापूर शहर आणि क्षितिजापर्यंत पसरलेली सागरसीमा नजरेत येते. टायगर स्काय टॉवरच्या जवळच असलेल्या मेर्लिऑन टॉवरच्या माथ्यावरून परिसर दर्शन करता येते.