पाडुरंग तथा भाऊसाहेब फुंडकर, राज्याचे कृषी मंत्री. भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष. अकोला लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा लोकसभेत पक्षाचे प्रतिनिधीत्व केले. राज्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि भाऊसाहेब फुंडकरांनी गावा गावात भारतीय जनता पार्टी पोहचवली. सरकार मध्ये असो अथवा नसो हे दोन नेते सदैव ग्रामीण महाराष्ट्रावर जादू करत राहिलं. मुंडे यांच्या पाठोपाठ फुंडकर साहेब ही गेल्याने पोकळी निर्माण झाली आहे.
पांडुरंग तथा भाऊसाहेब पुंडलिक फुंडकर हे वभारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. फुंडकर हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नवव्या, दहाव्या आणि अकराव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. पांडुरंग फुंडकर हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षही होते. सध्या ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात कृषीमंत्री म्हणून कार्यरत होते.
फुंडकर यांच्या राजकीय कारकिर्दीला जनसंघापासून प्रारंभ झाला. आणिबाणीविरोधी आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे त्यामुळे तुरुंगात जावे लागले. पुढे त्यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. त्यांनी कापसाच्या दरासाठी खामगाव ते आमगाव अशी पदयात्रा काढली होती.
अकोला लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडले गेले. राजीव गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसची प्रचंड लाट असतानाही पुढील निवडणुकीतही अकोला लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळविला.
यानंतर युती सरकारच्या काळात कापूस पणन महासंघाच्या मुख्य प्रशासकपदी नेमणूक झाली. त्याच काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते सतत तीन वर्षे कार्यरत होते. त्यांनंतर त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली आणि विरोधी पक्षनेते पद मिळाले. उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार देखील फुंडकर यांना मिळाला आहे.
भाजपमध्ये खूप काही सोसलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसमध्ये यावे यासाठी केंद्रात व राज्यात दोन मंत्रीपदे देऊ केली गेली होती. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘भगवा टिळा’ लावून मुंडे यांना रोखले, असा खळबळजनक गौप्यस्फोट मुंडे यांचे निकटचे सहकारी व भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांनी विधान परिषदेत केला होता. मुंडे यांच्या मृत्यूची वैद्यकीय कारणे वेगवेगळी सांगितली गेली व अपघातानंतर ५० मिनिटांमध्ये त्यांचे निधन झाल्याने याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणीही फुंडकर यांनी केली होती.
मुंडे यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘कृतज्ञता’ प्रस्तावावर विधान परिषदेतील चर्चेत बोलताना फुंडकर यांना आपल्या भावना आवरता आल्या नव्हत्या. मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले होते. मुंडे यांनी बरेच काही सहन केले आहे. त्यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्यासाठी ‘ऑफर’ देण्यात आली होती. ते शिवसेनाप्रमुखांना भेटले. पण त्यांनी पक्ष सोडू नको, असा सल्ला दिला. त्यांनी आम्हालाही विचारल्यावर मीही विरोध केला होता. त्यामुळे ते बारगळले. त्यानंतर जेव्हा त्यांच्यावर अपमानित होण्याचे प्रसंग आले, तेव्हा हेच पाहण्यासाठी मला थांबवले होते का, असे ते विचारत असत. त्यावेळी व आता निवडणुकीच्या वेळीही त्यांची कोंडी झाली होती. अनेक सुखदु:खाच्या प्रसंगात मी त्यांची साथ दिली. आता त्यांना चांगले दिवस आले होते. केंद्रात मंत्रीपद मिळाल्यावर सत्तारूढ बाकांवर बसण्याची संधी मिळाली, पण हे दिवस पाहण्यासाठी ते राहिले नाहीत, असे फुंडकर बोलल्यानंतर सर्वजन भावुक झाले होते. दोन्ही मित्रांना एकमेकांची दु:ख फार चांगल्या प्रकारे समजत होते.