Sunday, March 20, 2022

उजनीच्या भेटीला ''दो परदेशी''



मुबलक पाणी, जमिनीची सुपीकता यामुळे  उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेती बहरली आहे. मुख्य म्हणजे उजनी धरण व या धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी आणि पक्षी पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. यामुळे या क्षेत्रात अनेक कृषि पर्यटन केंद्र विकसित होत आहेत. आपण जेव्हा दुसऱ्या देशांमध्ये जातो. त्यावेळी आपल्या देशा विषयी आणखी अस्मिता जागी होते.

 डब्लिंगचे मित्र काहील यांच्याबरोबर रविवारी सकाळी उजनी चे पर्यटन केले. लहानपणापासूनच ...उजनी पहात आल्यामुळे फारसं आकर्षण मला असण्याचे काही कारण नाही. मात्र परदेशी पाहुण्यांना त्या ठिकाणी परदेशी पक्ष्यांचे दर्शन झाल्यामुळे त्यांना मनापासून आनंद झाला. तो आनंद पाहण्यासारखा होता. शाळेतील मित्र संतोष देवकाते यांनी या ठिकाणी उजनी या नावाने हॉटेल सुरू केले आहे. उजनीची भ्रमंती झाल्यावर उजनीतील मासे उजनीमध्ये खाण्यामध्ये वेगळी मजा आली.

 बहुतांश पक्षी रशियन सैबेरिया, काही पक्षी हिमालय, पूर्व युरोप आणि आफ्रिकेतून येतात. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातल्या भीमानगर (ता. माढा) या गावाजवळ आहे. या धरणाचे पाणी पुढे कर्नाटक राज्यामध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते. उजनी हे महाराष्ट्रातील जायकवाडी धरणानंतर सर्वात मोठे धरण आहे. सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील अर्थकारण व राजकारण यावर अवलंबून आहे. 

उजनी धरणाच्या माध्यमातून सुमारे २५००० कोटी रूपयाची उलाढाल होते. पर्यटनाच्या बाबतीत महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे दरवर्षी आवर्जून येणारे देश विदेशी हजारो पक्षी. यामुळे उजनी बॅकवॉटर जलाशय हा पाणपक्ष्यांसाठी देशात प्रसिद्ध पावत आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून या बॅक वॉटरच्या क्षेत्रात काही पर्यटन केंद्र विकसीत होत आहेत. 

उजनी धरण हे पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यास वरदायिनी ठरले असून या धरणावर परिसराचे विकास, अर्थ तसेच राजकारण अवलंबून आहे. धरणातील पाण्यावर ४४ सहकारी व खाजगी साखर कारखाने, १५ औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपूरक उद्योग अवलंबून असून, दरवर्षी ३० हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम बनला असून कृषि धवल औद्योगिक क्रांती झाली आहे.

 धरण क्षेत्र संरक्षित ठेवून इतर परिसर पर्यटन केंद्रम्हणून नियोजनबद्ध पद्धतीने विकसित करणे गरजेचे आहे. धरणाला लागून पुणे सोलापूर, जलाशयास समांतर टेम्भुर्णी ते नगर राष्ट्रीय महामार्ग, दक्षिण व उत्तर भारताला जोडणारी रेल्वे वाहतूक जेऊर, कुर्डुवाडी व भिगवण स्टेशन मार्गे आहे.  पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, जेजुरी, मोरगाव, दहिगाव, नरसिंहपूर या तिर्थक्षेत्रास दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. उजनी फुगवट्यावर क्रौंच, रोहित, बदके आदी ३५० प्रकारचे पक्षी, चिलापी, रोहू, कटला, वाम, मरळ आदी १५ प्रकारचे मासे यासह विविध पक्ष्यांचे वास्तव्य असते. यातील बहुतांश पक्षी रशियन सैबेरिया, काही पक्षी हिमालय, पूर्व युरोप आणि आफ्रिकेतून येतात.

उजनी माश्यांचा ब्रँड महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगाल येथे निर्माण झाला असून भिगवण, इंदापूर ही ठिकाणे मत्स्य केंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. उजनी पट्ट्यात मत्स्य अभ्यास,पक्षी निरीक्षण, वनस्पती अभ्यास केंद्र, प्राणी संग्रहालय, खाद्यमॉल उभारून पर्यटकांना आकर्षित करणे शक्य असून त्यातून रोजगार निर्मिती होऊन अर्थकारण देखील मजबूत होऊ शकते. मात्र परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच त्यांच्या शेती व्यवसायास धक्का न लावता पर्यटनकेंद्र विकसितझाल्यास देश परदेशातील पर्यटक या परिसराला भेटी देतील मात्र त्यासाठी नेत्यांची जबरदस्त इच्छा शक्ती हवी.

स्थानिकांना रोजगार मिळेल... उजनी जलाशयावर वर्षभर वेगवेगळ्या खंडातून पक्षी येत असतात. यामुळेदेखील पर्यटन व्यवसाय वाढेल, तसेच राष्ट्रीय महामार्गावर उजनी धरण    असल्याने हॉटेलिंग व्यवसायही निसर्गरम्य वातावरणात नावारूपाला येईल. रोजगारात वाढ होईल व संबंधित विभागाला पर्यटनाच्या माध्यमातून महसूल गोळा होईल, असे उजनी हॉटेलचे मालक संतोष देवकाते यांनी सांगितले यांनी सांगितले

. तर रोजगारनिर्मिती व्हावी, गर्दी वाढावी, खाजगी उद्योग आणि रोजगार यांचा ताळमेळ घालून उजनी परिसराचा विकास झाला पाहिजे त्यासाठी उजनी धरणावरील पर्यटन क्षेत्राला लवकरात लवकर डेव्हलप करणे गरजेचे बोट व्यवसायिक सचिन देवकाते यांनी सांगितले.

दिगंबर दराडे
पुणे  21मार्च 2022

Friday, March 18, 2022

राजस्थानचा "चंग"

 

राजस्थानच्या होळीमध्ये चंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा चंग वाजवत राजस्थानी बांधव होळीचा सण साजरा करतात. प्रामुख्याने यामध्ये चंग वाजवत वाजवत गाण्याच्या तालावर सर्वजण गातात. धुलीवंदनाच्या दिवशी पुण्यातील राजस्थानी बांधवांनी आणि माझे मित्र मगराज राठी यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  महाराष्ट्रात हलगी वाजवली जाते. हलगी छोटी असते. चंग मात्र मोठा असतो.

 हा चंग सर्वजण एका तालात वाजवतात.  प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील संस्कृती समजून घेताना एक वेगळी मजा येते. महाशिवरात्री नंतर हे चंग बाजारात दिसायला लागतात. बाजारातून, गली-मोहल्लों मे चंगच्या थापेवर  होळीची गाणी गात महिला आणि पुरुष नृत्य करत असतात.

होळी हा रंग आणि हास्याचा स जेण आहे.  हा भारतातील एक प्रमुख आणि प्रसिद्ध सण आहे, जो आज जगभरात साजरा केला जात आहे. हा सण, ज्याला रंगांचा उत्सव म्हणतात, पारंपारिकपणे दोन दिवस साजरा केला जातो.  तो प्रामुख्याने भारत आणि नेपाळमध्ये साजरा केला जातो.  हा सण इतर अनेक देशांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो ज्यामध्ये अल्पसंख्याक हिंदू लोक देखील राहतात.  पहिल्या दिवशी होळी पेटवली जाते, ज्याला होलिका दहन देखील म्हणतात.  दुस-या दिवशी, ज्याला मुख्यतः धुलेंडी आणि धुरडी, धुरखेल किंवा धुलिवंदन या नावाने ओळखले जाते.

लोक एकमेकांवर रंग, अबीर-गुलाल इत्यादी फेकतात, ढोल वाजवून होळीची गाणी गायली जातात आणि लोक घरोघरी रंगतात- दार. आहे.  असे मानले जाते की होळीच्या दिवशी लोक जुने कटुता विसरतात आणि मिठी मारतात आणि पुन्हा मित्र बनतात.  एकमेकांना रंगवण्याची आणि गाणी वाजवण्याची फेरी दुपारपर्यंत चालते.  यानंतर आंघोळ करून, विश्रांती घेतल्यानंतर, नवीन कपडे परिधान करून, लोक संध्याकाळी एकमेकांच्या घरी जातात, मिठी मारतात आणि मिठाई खातात.

Thursday, March 17, 2022

द काश्मिर फाईल्स



काश्मिर फाईल्स या चित्रपटाबद्दल दिवसाला सरासरी पाच पोस्ट तर नक्की वाचल्या असतील. खरंतर विवेक रंजन अग्निहोत्रीचा बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम आणि द ताश्कंत फाईल्स बघितल्यानंतर बॉलिवूडच्या चौकटी लांघणारा हा दिग्दर्शक आहे, आणि दिग्दर्शकाच्याही पलीकडे त्याचा काहीतरी वेगळा दृष्टिकोन आहे, सिनेमा हे माध्यम हाताळण्याची त्याची हातोटी वेगळी आहे याची खात्री पटली होती आणि त्यामुळेच काश्मिर फाईल्स या चित्रपटाबद्दल कुतूहल होतं. 

भ्रमंती हा आपला आवडीचा छंद असल्याने १५ मे २०१८ रोजी काश्मीर फिरण्याचा योग आला. निसर्ग संपन्न असलेला हा परिसर प्रत्येकालाच  खुणवतो. इथला इतिहास अंगावर शहारे आणतो. काश्मीर ही सर्वांची अस्मिता आहे.  अन्य राज्यांच्या तुलनेत काश्मीर हे शब्द जरी ऐकले आपलं देश प्रेम उफाळून येते. यावेळी काश्मीर मधील मराठी प्रशासकीय सेवेतील अधिकारी सागर डोईफोडे यांच्या घरी जाण्याचा योग आला. त्यांनी त्या ठिकाणी केलेला पाहुणचार आजही स्मरणात आहे. 


त्यावेळी आपला मराठी प्रशासकीय अधिकारी काश्मीरकडे कोणत्या नजरेने पाहतात.. हे पत्रकार म्हणून निरीक्षण केले. मला निसर्गसंपन्न वाटणारा काश्मीर त्यादिवशी तेथील विकास, इतिहास, रूढी परंपरा, तेथील परिस्थिती पाहता वेगळा समोर आला. भारतीय सैनिकांनी दिलेला कडेकोट बंदोबस्त तेथील इतिहासात आपल्याला घेऊन जातो.  नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या द काश्मीर फायल्सने पुन्हा एकदा इतिहासाकडे नेले. गुलमर्गच्या व्हॅलीमध्ये घोड्यावर बसून जात असताना घोड्याचा पाय घसरला. 

मी एका साईटला पडलो. खूप घाबरलो होतो. मात्र सुदैवाने कोणतीही वाईट घटना घडली नाही. आजही ती घटना आठवली तरी अंगावर शहारे येतात. आम्ही घोड्यावर बसून बर्फवृष्टी पाहायला आम्ही चाललो होतो.  त्यानंतर  काही दिवसांनी गुलमर्गमधील याच महादेवाच्या मंदिरात आपले पाच आमदार जाणार होते.  श्रीनगर रस्त्यावरून  जाताना बाॅम्बस्फोट झाला. सुदैवाने सर्वजण बचावले. या मंदिरात जय जय शिवशंकर या गाण्याचे शुटिंग झाले आहे.

१९/२० जानेवारी १९९० उगवलेच नसते तर बरं झालं असतं असं वाटावं इतकी नृशंस कत्तल हिंदूंची झाली आणि उर्वरित देशाने ती मूकपणे पाहिली. काश्मीर खोऱ्यातल्या हिंदूंचे अस्तित्व पुसण्याचा आणि पुरोगामी फाईलींमधे बंद करून टाकलेला हा रक्तरंजित इतिहास ,आज बत्तीस वर्षांनी देशासमोर ठेवला गेलाय. ज्ञानाची गंगोत्री असलेलं, विद्येचं शक्तिपीठ असलेलं काश्मीर वामपंथी इकोसिस्टीमने पद्धतशीरपणे हिरवं रंगवून देशापासून तोडलेलं राहील याची काळजी कशी घेतली हे चित्रपट पाहताना जाणवतं आणि प्रचंड राग राग होतो. “फ्री कश्मीर”, “आजादी”, “अफझल हम शर्मिंदा है ” म्हणणारी लालहिरवी पिलावळ कशी पोसली जाते हेही या चित्रपटाने पुन्हा एकदा दाखवून दिलंय.

या दहशतवादी प्रयत्नांना पाठिंबा देणारी इनव्हिजीबल आर्मी म्हणजे लुटीयन मिडीया, भारताच्या सेनेचं मनोबल खच्ची करणारी तेव्हाची शासनसंस्था, किडामुंग्यांपेक्षाही वाइट पद्धतीने मारले गेलेले काश्मीरी पंडित मोठ्या पडद्यावर बघताना अंगाचा थरकाप उडतो आणि डोळ्यातून पाणी ओघळतं. वर्षानुवर्ष मागच्या सरकारांनी विविध फाईल्समधे दडवलेलं हे भीषण सत्य, वास्तवात घडून गेलेलं क्रौर्य आपल्यासमोर ठेवताना अग्निहोत्रीने ताश्कंद फाईल्सप्रमाणेच फुलप्रुफ काम केलंय. 

आज जेएनयू सारख्या संस्थांमधून देशविरोधी विखार,फुत्कार कसे जोपासले जातात आणि तथाकथित बुद्धिवादी प्राध्यापक मंडळी त्याला खतपाणी कशी घालतात हेही ठळकपणे जाणवतं. वर्षानुवर्षे याच तथाकथित उदारमतवादी बुद्धिवादी लोकांनी काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराबद्दल न बोलणं अथवा खोट्या कथा पसरवण्याचं काम केलं. म्हणूनच “जब तक सच जुते पहनता है, तब तक झूट नंगे पाँव गाव घुम आता है” याचा प्रत्यय आपल्याला काश्मीर प्रकरणात आलेला आहे.

एकीकडे काश्मिर ही एक जखम आहे म्हणत असताना तेच काश्मिर पृथ्वीवरचं नंदनवन आहे, स्वर्ग आहे, सौंदर्य आणि निसर्गाच्या चमत्कृतींचा भव्य असा देखावा आहे हे ही ऐकत मी मोठी झाले. त्यामुळे पहिल्यापासूनच काश्मिर बद्दल एक अगम्य गूढ आणि अनामिक ओढ अशा दोन्ही भावना मनात होत्या. 

 दिगंबर दराडे
18 मार्च  2022
पुणे

Thursday, March 10, 2022

असा जिंकला 'आम आदमी' !



आप पंजाबमध्येएवढा मोठा विजय मिळवेलं असं कुणालाही वाटलं नव्हतं पण, गेल्या सहा महिन्यात आम आदमी पक्षानं असं काय केलं की, पंजाब करांनी त्यांच्या हाती सत्ता दिली. काय आहे आम आदमी पार्टीचा विजयी फॉर्म्युला ?,याबद्दलचा हा रिपोर्ट

 पंजाबमधील 117 मतदार संघांपैकी 90 जागांवर आपने बाजी मारली आहे. प्रमुख्याने दिल्लीमध्ये केलेली आपने कामगिरी संपूर्ण देश ओळखत आहे. प्रामुख्याने जाहीरनाम्यामध्ये मोफत वीज शिक्षण आरोग्य या बाबींवर भर देण्यात आला होता. प्रचारामध्ये विकासाच्या मुद्द्यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते. केजरीवाल यांच्यावर ती केलेला देशद्रोहाचा आरोप विरोधकांवर बूमरँग झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मुख्यमंत्रीपदाचे असलेले उमेदवार भगवत सिंग मान असा देखील करिश्मा पाहायला मिळाला.

 पंजाबमधील जनतेने यावेळी आपवर विश्वास ठेवत पाठिंबा दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पंजाबमधील या विजयाचे चित्र पाहता आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेचे आभार देखील मानले आहेत.

पंजाब विधानसभा निवडणूक निकालामध्ये  आम आदमी पक्षाची जादू पाहायला मिळत आहे. पंजाबमध्ये आपच्या झाडूने काँग्रेसची सफाई केली आहे. निवडणूक निकालामध्ये आपने अनेक जागांवर बाजी मारत काँग्रेसचा पराभव केला आहे. त्यामुळे पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंजाबमधील 117 मतदार संघांपैकी 92 जागांवर आतापर्यंत आपने बाजी मारली आहे. 

पंजाबमधील जनतेने यावेळी आपवर विश्वास ठेवत पाठिंबा दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पंजाबमधील या विजयाचे चित्र पाहता आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांनी पंजाबच्या जनतेचे आभार मानले आहेपंजाबमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरुन आम आदमी पार्टीने सर्व पक्षांना मागे टाकत मुसंडी मारली आहे. आम आदमी पार्टी 92 जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी काँग्रेस फक्त 18 जागांवर, अकाली दल 4 जागांवर, भाजप 2 जागांवर आणि अन्य 1 जागेवर आघाडीवर आहे.

 ही निवडणूक काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि भाजपसाठी खूपच चुरशीची आहे. पण सध्या हाती आलेल्या निकालावरुन आपच्या झाडूने इतर सर्वच पक्षांची साफसफाई केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पंजाबमधील विजयाबद्दल अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत पंजाबच्या जनतेचे आभार मानले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये 'या क्रांतीसाठी पंजाबमधील जनतेचे खूप खूप आभार.' असे लिहिले आहे.

Wednesday, March 9, 2022

...अब योगी योगी कहना है



 ग्राउंड रिपोर्ट
 दिगंबर दराडे


हम निकल पड़े हैं प्रण करके
अपना तन-मन अर्पण करके
जिद है एक सूर्य उगाना है
अम्बर से ऊँचा जाना है
एक भारत नया बनाना है ..



उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरील ट्विट करून यूपीकरांना चुचकारले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद  योगींच्या पाठीशी असल्याने त्यांनी निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे. राम मंदिरापासून ते गंगेच्या घाटापर्यंत.. गंगेच्या घाटापासून ते वाराणसी एअरपोर्ट पर्यंत.. घराणेशाहीला विरोध करत.. हिंदुत्वाचा नारा देत.. विकास म्हणजे मोदी..आणि मोदी म्हणजेच विकास.. असे आराखडे या निवडणुकीमध्ये आखण्यात आले. पहिल्या असले पासूनच मोदींनी उत्तर प्रदेशसाठी डबल इंजिनचे सरकार द्या असे आव्हान येथील जनतेला केले होते. या आव्हानाला साथ देत यूपी मे रहना है तो योगी योगी कहना है

 हा नारा खरा केल्याचे आज स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही प्रयागराज, वाराणसी, अयोध्या या ठिकाणी जाऊन ग्राउंड रिपोर्ट मांडला. सर्वात प्रथम मोदी यांची काशी विश्वेश्वराबद्दल असलेली श्रद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. हिंदुत्व आणि काशी यांची सांगड घालत मोदीने ही निवडणूक आपल्या हातात ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवस दिवस सभा करत योगी आणि मोदींनी संपूर्ण 75 जिल्ह्यांचा उत्तर प्रदेश पिंजून काढला. संध्याकाळच्या सभेच्या वेळी मोदींना बोलताना प्रचंड त्रास होत असताना देखील त्यांनी आपली पक्कड कमी होऊ दिली नाही. 

योगी आणि मोदींची समय सूचकता या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली. जेव्हा मोदीनी वाराणसीमधून निवडणूक लढवली. त्यावेळी मोदींनी गंगा मा ने बुलाया है.. अशी आर्त हाक यूपीकरांना टाकली होती. या हाकेला लोकांनी मनापासून साथ दिली होती. यावेळी देखील योगी आदित्यनाथ यांनी वेगळ्या पद्धतीने ही निवडणूक हाताळली असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर योगी आदित्यनाथ गोरखपुरसे संसद रहायचे.   योगी आदित्यनाथ यांनी गेल्या ५ वर्षात यूपीमध्ये केले. योगी आदित्यनाथ का मूल नाव अजय सिंह बिष्ट आहे.  ते गोरखपुर येथील प्रसिद्ध गोरखनाथ मंदिराचे महंत आहेत.  लोकप्रियतेच्या बाबतीत भारतात योगी आदित्यनाथ यांचा देशातील पहिल्या पाच नेत्यांचा समावेश आहे. ही निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचा दुसरा क्रमांक लागणार आहे.

Monday, March 7, 2022

योगी येणार पण जागा घटणार



ग्राउंड रिपोर्ट
दिगंबर दराडे

उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा सरकार स्थापन करतील. मात्र मागच्या वेळी आलेल्या तीनशे जागांचा आकडा यावेळी त्यांना पार करता येणार नाही. तर सपाची मजल दीडशे जागपर्यंत जाईल. या ठिकाणी मात्र एमआयएम फॅक्टर फारसा चालणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.  मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे.





युपीत योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा सत्ता आणण्यासाठी चांगलाच जोर लावला आहे. अमित शाह यांच्यापासून ते पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत सर्वच नेते उत्तर प्रदेशात प्रचार करताना दिसून आले. त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.यूपी विधानसभेत एकूण 403 जागा आहेत आणि बहुमतासाठी 202 जागा आवश्यक आहेत.
उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ७ टप्पे करण्यात आले होते. १०, १४ , 20 , 23 , 27 फेब्रुवारी आणि 03 मार्च रोजी मतदान पार पडलं होते.

भाजपला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे, पण त्यांना किमान 80 ते 90 जागांचे नुकसान होत आहे. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व त्यांचा पक्ष 300 चा आकडा पार करणार असल्याचा दावा करत आहेत. मात्र ती परिस्थिती या निवडणुकीत पहायला मिळणार नाही. उत्तर प्रदेशचं युद्ध कोण जिंकतं हे लवकरच स्पष्ट होईल. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा कमळ फुलण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्य भाजपाला 223-228 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर समाजवादी पक्षाला 138 - 157 जागा मिळतील. उत्तर प्रदेशमध्ये बसपाला 5 - 11 तर काँग्रेसला 4 - 7 जागांवर समाधान मानावं लागणार आहे.

 एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगी सरकार सत्तेत येण्याची चिन्ह आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांनी उत्तर प्रदेशमध्ये जोर लावला होता.
प्रचारसभेत जोरदार आरोप प्रत्योराप पाहिला मिळाले. भाजप आणि सपात चुरशीची लढत झाली. भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये भाजप पहिल्या स्थानावर असला तरी गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा मोठा फटका बसताना दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 403 जागांपैकी तब्बल 312 जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं. त्यावेळी मोदी लाटेचा फायदा उत्तरप्रदेशमध्ये भाजपाला झाल्याचं बोललं जात आहे.

ऐकेकाळी पुर्ण उत्तर प्रदेशवर आपली एकहाती सत्ता गाजवणारा मायावतींच्या  बहुजन समाजवादी पक्षला  मात्र जास्त जागा मिळवू शकत नसल्याचं चित्र आहे.  तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी  यांच्या नेतृत्वात स्त्रीयांसाठी अनेक आश्वासन दिली तरी देखील त्यांना युपीतील जनतेन काँग्रेसला जास्त पसंती दिली नसल्याचं चित्र समोर येत आहे.





Saturday, March 5, 2022

मैं झुकेगा नही...



युक्रेन हा अतिशय छोटा देश आहे. मात्र येथील नागरिकांच्या अंगामध्ये असलेला चिवटपणा खूप वेगळा आहे. युक्रेनला भेट दिल्यानंतर तेथील संस्कृती, शिक्षणाबद्दलची जागृती आणि आपल्या देशाबद्दलची अस्मिता खूप वेगळी आहे हे दिसून येते. अन्य देशांच्या तुलनेत युक्रेनमधील कायदे देखील खूप कडक आहेत.  प्रवासाच्या दरम्यान घडलेला एक किस्सा आपणास सांगतो.   कीवच्या एअरपोर्टला आम्ही उतरल्यानंतर परदेश नागरिक फोटो काढत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.  कीवचा एअरपोर्ट खुप सुंदर आहे. याठिकाणी प्रत्येकाचाच फोटो काढण्याचा मोह होतो. मात्र परदेशी नागरिक फोटो काढत असल्याचे युक्रेन पोलिसाला आवडले नाही.  

फोटो काढत असल्याचे पाहून पोलीस परदेशी नागरिकांपर्यंत आले. का काढले असा त्यांनी प्रश्न विचारला. त्या पोलिस अधिकाऱ्याला ते आवडलं नव्हते. त्यांच्या कायदात देखील ते बसत नव्हतं. पोलिसांनी एअरपोर्टवर एक रिंगण आखले  त्यामध्ये परदेशी नागरिकांना बसवण्यात आले. त्या ठिकाणाहूनच युक्रेन पोलिसांनी त्या परदेशी नागरिकांना मायदेशी पाठवलं. त्यावेळी त्या नागरिकांनी खूप विनंती केली. त्यांच्या देशातीलमध्ये असलेल्या नागरिकांनी देखील त्यांना युक्रेनमध्ये  घेण्याचा प्रयत्न केला. 

मात्र पोलीस काही झुकले नाहीत. ते त्यांच्या मतावर ठाम राहिले. हा प्रसंग माझ्या डोळ्यांनी युक्रेनमध्ये पाहत असताना अंगावर शहारे आले. तेव्हापासून कधीही कोणत्या एअरपोर्टवर फोटो न काढण्याची शिकवण घेतली. त्याच वेळी युक्रेनवाले झुकनेवाले मे नही है हे स्पष्टपणे जाणवले. आणि त्याचा प्रत्यय सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धामध्ये दिसून येत आहे. युक्रेनचे राष्ट्रपती त्यांनी देखील आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. छोटा देश रशियावर तुटून पडताना दिसत आहेत हे त्यांचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की.... त्यांचा जन्म 25 जानेवारी 1978 रोजी तत्कालीन सोव्हिएत युनियन शहरात क्रिव्ही रिह येथे झाला.  

हे शहर सध्या युक्रेनचा भाग आहे.  झेलेन्स्कीचे पालक ज्यू होते.  लहानपणी, झेलेन्स्कीचे कुटुंब मंगोलियातील एर्डेनेट येथे राहायला गेले.  या कारणास्तव व्होलोडिमिर झेलेन्स्कीचे प्रारंभिक शिक्षण मंगोलियामध्ये झाले.  असे असूनही त्याने युक्रेनियन आणि रशियन भाषेवर आपली पकड कायम ठेवली.  मोठा झाल्यावर, तो युक्रेनला परतला आणि 1995 मध्ये कीव नॅशनल इकॉनॉमिक युनिव्हर्सिटीमधून कायद्याची पदवी घेतली.  असे असूनही, झेलेन्स्कीने कॉमेडी क्षेत्रात आपली कारकीर्द घडवली.  त्याच्या अभ्यासादरम्यान, झेलेन्स्कीला थिएटरचे खूप आकर्षण होते. 

 1997 मध्ये तो परफॉर्मन्स ग्रुप, क्वार्टल 95, KVN च्या फिल्ममध्ये दिसला. सुरुवातीला शिक्षण पूर्ण केल्यानंतर वोलोदिमीर जेलेंस्की यांना इजराइलमध्ये अभ्यास करण्याकरता स्कॉलरशिप मिळाली परंतु वडिलांची परवानगी न मिळाल्या कारणामुळे वोलोदिमीर यांनी कीव येथून आपले शिक्षण पूर्ण केले. 2000 मध्ये कीव नेशनल इकोनॉमिक यूनिवर्सिटीद्वारे लॉची डिग्री प्राप्त करून आपले ग्रेजुएशन पूर्ण केले. 73 % मतं मिळवून बनले राष्‍ट्रपती : 2018 मध्ये वोलोदिमीर यांनी राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. वोलोदिमीर यांनी ‘सर्वेंट ऑफ द पीपल पार्टी’ बनवली.या पक्षातून त्यांनी राष्‍ट्रपती पदासाठी निवडणूक लढवली. निवडणुकीत 73 % वोट मिळवून त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि देशाचे राष्ट्रपती पद भूषविले. रशियाविरुद्ध लढत असताना. ते खूप भावूक झाले. मात्र स्वतः शस्त्र हातात घेऊन आपल्या देशासाठी आपल्या अस्तित्वासाठी त्यांनी लढण्याची तयारी केली.

Digambar Darade  
(3 मार्च २०२२)
Pune 
https://www.blogger.com › ...
User Profile: Digambar Darade - Blogger.com

Tuesday, March 1, 2022

हरहरगंगे... प्रयागराजमध्ये योगीराजला झुकते माप


सोळाव्या शतकातील अलाहाबाद आता प्रयागराज बनले आहे. पण नाव बदलल्याने आणखी काही बदल झाला आहे का? कामाच्या जोरावर भाजप पुनरागमन करणार की समाजवादी पक्ष आपल्या सायकलचा वेग वाढवणार, हे या निवडणुकीतून पुढे येणार आहे. संगम येथील हनुमानजींच्या मंदिरात लाखो लोक सतत दर्शनासाठी येतात. त्यामुळे या शहराची वेगळी ओळख आहे. नुकत्याच झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भविष्याची फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धाळूंवर राज्यातील तरुणांचा विश्वास बसू शकत नाही. प्रयागराज आणि प्रतापगडच्या 19 विधानसभा जागांच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या बैठकीत फाफामाऊच्या बेला कचरमध्ये पंतप्रधानांनी योगी-केशव जोडीच्या कार्याचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, आशावादींच्या भविष्याशी खेळणाऱ्यांपासून यूपीला वाचवले पाहिजे. राज्यातील युवक वाचवा. 

 प्रयागराजमध्ये पुढारीच्या टीमने धनंजयसिंग ठाकूर यांना विचारले, शिक्षण रोजगार शेती हे जरी असले तरी मोदीराजच प्रयागराजमध्ये येईल. तुमच्यासाठी निवडणुकीतील मुद्दे काय असतील, यावेळी सुनील गुप्ता यांनी सांगितले, शिक्षण, सिंचन, रोजगार हे यावेळचे प्रश्न आहेत. तर. ..निसाद केवट, म्हणाले यावेळी योगी येतील आणि तेच मुख्यमंत्री होतील, मग चांगले होईल. निवडणुकीत महिलांचा मुद्दा काय असेल? यावर एक व्यक्ती म्हणाली, महिलांचा मुद्दा असा आहे की योगीजी पुन्हा येणार आहेत. असा प्रश्न विचारला असता? कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार, ही सुरक्षा आहे का, महागाई आहे का? उदय ठाकूर म्हणाले, महिलांच्या सुरक्षेचा देखील प्रश्‍न महत्त्वाचा आहे. समाजवादी पक्षाची सत्ता येणार आहे. बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, नोकऱ्या हरवल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. नुकतीच गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा या प्रयागराज या ठिकाणी पार पडली. गंगा, यमुना या नद्यांचा प्रयागराज शहरानजीक संगम होतो. या नद्यांना लुप्त सरस्वती नदीही येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात. कुंभमेळ्याच्या चार क्षेत्रांपैकी प्रयाग एक आहे. 

गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमाचे स्थान असलेल्या या शहराला यापुढे 'प्रयागराज' म्हणून ओळखले जाणार आहे. 'प्रयाग' हे या शहराचे फार जुने नाव. मुघल सम्राट अकबराने ते बदलून 'अलाहाबाद' केले. अलाहाबादी संस्कृतीचा या देशावर प्रभाव आहे. सांस्कृतिक, धार्मिकदृष्ट्या आहे, तसाच तो राजकीयही आहे. एकूण पंधरापैकी सात पंतप्रधानांचे अलाहाबादशी गहिरे नाते राहिले आहे. या शहराच्या नामबदलाचा प्रस्ताव २५ वर्षे जुना आहे. मात्र निर्णय होत नव्हता. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने मागे लावून हा निर्णय केंद्राकडून मंजूर करवून घेतला. मनोरंजक लढत उत्तर प्रदेशमध्ये आहे, जिथे काँग्रेस आणि बसपा अस्तित्वासाठी लढताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि भाजपामध्ये थेट लढत आहे. कृषीविषयक कायदे परत घेतल्यानंतर शेतकऱ्यांचा संताप कमी झाला आहे का आणि दुसरा, द्वेषयुक्त भाषणामुळे अल्पसंख्याकांचे ध्रुवीकरण होईल का? याशिवाय करोनामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू आणि वाढलेली महागाई हे निवडणुकीचे मुद्दे आहेत की नाही हे स्पष्ट होईल. या प्रश्नाचे उत्तरही निवडणूक निकालात सापडेल. उत्तर प्रदेशमध्ये ४०३ जागांवर मतदान होणार असून यापैकी किमान ११० विधानसभा जागांवर शेतकरी आंदोलनाचा परिणाम झाला आहे. पंजाबमधील शेतकरी आंदोलकांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा २० मिनिटे उड्डाणपुलावर अडकून पडल्यानंतर त्याचा पहिला परिणाम दिसून आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये ४०३ जागांवर मतदान होणार असून यापैकी किमान ११० विधानसभा जागांवर शेतकरी आंदोलनाचा परिणाम झाला आहे.

उत्तर प्रदेशात या भागात २०१७ मध्ये भाजपाने ८० जागा जिंकल्या होत्या. हे राज्यातील मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र देखील आहे. अशा परिस्थितीत मुस्लिमांच्या संगनमताने मतांच्या धर्तीवर शेतकरी आंदोलनामुळे जाटांच्या संतापाचा काय परिणाम होतो. हे देखील पाहण्यासारखे असेल. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. करोनामुळे निवडणुकीसाठी नवीन प्रोटोकॉल करण्यात आला आहे. 

पश्चिम उत्तर प्रदेशच्या ११० जागांवर शेतकरी आंदोलनाचा प्रभाव आहे. इथे राकेश टिकैतही एक चेहरा म्हणून समोर आला आहे. ते कोणाला पाठिंबा देणार आणि भाजपाची इथं काय स्थिती असेल हे जाणून घेण्यात सगळ्यांनाच उत्सुकता आहे. राकेश टिकैत यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला असला, तरी त्यांचा विशिष्ट पक्षाला पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे.

होम ग्राउंड वरून मोदी देणार विजयाचा मंत्र


वाराणसी. संपूर्णानंद संस्कृत रविवारी विद्यापीठात होणाऱ्या बुथ विजय संमेलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीत बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देणार आहेत. कार्यक्रमात आठ विधानसभांच्या 3361 बूथचे 20166 बुथ अधिकारी परिषदेला उपस्थित राहणार आहेत. येथे संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पदाधिकाऱ्यांना प्रवेशाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष हंसराज विश्वकर्मा, महानगर अध्यक्ष विद्यासागर राय यांनी सांगितले की, बूथ अधिकाऱ्यांमध्ये पंतप्रधानांशी झालेल्या संवादाबाबत प्रचंड उत्साह आहे. परिषदेत विभागीय स्तरावर कामगारांच्या बसण्यासाठी 32 ब्लॉक करण्यात आले आहेत.

पंतप्रधानांच्या इच्छेनुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे महानगर अध्यक्षांनी सांगितले. स्टेजजवळ बांधण्यात आलेल्या गॅलरीमध्ये प्रत्येकी चार ब्लॉक आहेत. पंतप्रधान प्रथम गोल्फ कार्टमधून बूथ पदाधिकाऱ्यांकडे जाणार आहेत. जिल्हाध्यक्ष हंसराज विश्वकर्मा म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कामगारांवर आधारित पक्ष आहे. या पक्षात पदाधिकार्‍यांपासून ते लहानमोठ्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना समान अधिकार आहेत. पीएम मोदी हे असे पहिले प्रधान सेवक आहेत, जे खालच्या आणि महत्त्वाच्या युनिट बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी जोडलेले आहेत. 


 उत्तर प्रदेशात 2002 साली झालेल्या 14व्या विधानसभा निवडणुकीत एक नवा बदल पाहायला मिळाला. गेल्या 13व्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्व डोंगराळ भागांचा राज्य विधानसभेत समावेश करून 2000 मध्ये उत्तर प्रदेशचे तुकडे करून नव्याने निर्माण झालेल्या उत्तराखंड राज्यात गेले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशातील धनसभेच्या जागांची संख्या 403 झाली. दुसरीकडे, उत्तराखंडचे नवीन राज्य 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागले गेले. 13व्या विधानसभा निवडणुकीपर्यंत यूपीमध्ये समाविष्ट असलेले सर्व विधानसभा मतदारसंघ उत्तराखंडमध्ये गेले होते. 

 ज्यामध्ये उत्तरकाशी, टिहरी, देवप्रयाग, चक्रता, डेहराडून, मसुरी, हरिद्वार, लँडस्डाउन, रुद्रप्रयाग, बद्रीनाथ, अल्मोरा, हदवानी, नैनिताल, काशीपूर आणि पिथौरागढ असे झाले. 2002 मध्ये यूपीमध्ये झालेल्या चौदाव्या विधानसभा निवडणुकीत, राज्यातील पहिली जागा 1-नी शिवहारा, दुसरी जागा विधानसभा मतदारसंघ 2-धामपूर पी आणि शेवटच्या दोन जागा विधानसभा मतदारसंघ 402 सहारनपूर आणि विधानसभा मतदारसंघ 403 मुझफ्फराबाद होत्या. उत्तर प्रदेशच्या या नव्या स्वरूपातील विधानसभेच्या जागांच्या संख्येत बदल झाल्यामुळे वाराणसीतील काही जागांची संख्याही बदलली. राज्यातील 14व्या विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ कोटी 97 लाख 56 हजार 327 मतदार होते. त्यामध्ये पुरुष व पुरुष मतदारांची संख्या पाच कोटी 47 लाख 38 होती हजार ४८६ होती.

आयोध्याच्या निवडणुकीत धर्माचाच मुद्दा

आयोध्या : काळ बदलला, परिस्थिती बदलली, श्री राम मंदिराच्या उभारणीलाही सुरुवात झाली, पण हा मुद्दा अजूनही राजकारणाच्या अंडरकरंटमध्येच आहे. या निवडणुकीतील विजय-पराजयाची पटकथा या पार्श्वभूमीवर लिहिण्याचा प्रयत्न आहे. अयोध्येत पुन्हा एकदा विचारांची लढाई सुरू झाली आहे. मंदिर-मशीद वाद चव्हाट्यावर आल्यानंतर येथील निवडणुकीतील विजय-पराजयाचा निर्णय वादाच्या पार्श्वभूमीवर होत आहे. राम मंदिर उभारणीला सुरुवात झाल्यानंतर राजकारणामधील या मुद्द्यावर पडदा पडेल असे वाटत असताना देखील निवडणूक कोणतीही असो या निवडणुकींना धर्माचा रंग अयोध्येत मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
वेळेची पर्वा न करता निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी झालेले ध्रुवीकरण विजयाचा मार्ग मोकळा करते. काळ बदलला, परिस्थिती बदलली, श्री राम मंदिराच्या उभारणीलाही सुरुवात झाली, पण हा मुद्दा अजूनही राजकारणाच्या अंडरकरंटमध्येच आहे. या निवडणुकीतील विजय-पराजयाची पटकथा या पार्श्वभूमीवर लिहिण्याचा प्रयत्न आहे. देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेली अयोध्या पुन्हा त्याच भूमिकेत आहे. भाजप, बसपा, आप यांसारख्या अनेक पक्षांच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचा शंख येथूनच जाहीर आणि अघोषित केला आहे. अयोध्या सोडवण्याचा प्रयत्न केला. अयोध्या अजूनही राजकारणाच्या प्रवाहात वेगाने वाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 अयोध्या हा सर्वांच्या नाकाचा प्रश्न बनला आहे. भाजपला आपले वर्चस्व कायम ठेवून बदललेल्या परिस्थितीत आपली मते आणि राजकीय पकड याचा संदेश द्यायचा आहे. मात्र, अयोध्येच्या राजकीय कब्जासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी आपापले योद्धे मैदानात उतरवले आहेत. अनेक दशकांपासून आपली पकड कायम ठेवणाऱ्या भाजपने आमदार वेदप्रकाश गुप्ता यांना पुन्हा पुढे केले आहे, तर सपाने गेल्या निवडणुकीत अपयशी ठरलेले तेज नारायण पांडे पवन यांना उमेदवारी दिली आहे. बसपने रवी मौर्य यांना नवा उमेदवार उभा केला आहे, तर काँग्रेसने नऊ वर्षांनंतर रिटा मौर्य या महिला उमेदवाराला उभे केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या दर्शन-पूजेनंतर उत्साहात ‘आप’ने जिल्ह्यातील इतर जागांसह येथेही उमेदवार उभे केले आहेत. 

सर्वसामान्यांच्या नजरेत सपाचे उमेदवार तेज नारायण पांडे हे व्यवहारी, बोलके आणि लोकांमध्ये राहिले आहेत. तो अवाजवी बोलतो आणि मुद्दे खोटे बोलतो. पण, त्यांच्या आमदारकीच्या काळात झालेल्या नाराजीचा परिणाम अजूनही जाणवत आहे. येथून आमदार असलेले डॉ. निर्मल खत्री यांनी राज्यात राज्यमंत्री, दोन वेळा खासदार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, भाजपचे अनेकवेळा आमदार, राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले लल्लू सिंह. , दोन वेळा खासदारकीसह संघटनेच्या अनेक मोठ्या पदांवर राहिले आहेत. भाजप आणि सपाच्या उमेदवारांना प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. भाजपचे उमेदवार वेदप्रकाश गुप्ता चौथ्यांदा रिंगणात आहेत. ते 2007 च्या निवडणुकीत सपाच्या तिकिटावर आणि 2012 च्या निवडणुकीत बसपाच्या तिकिटावर रिंगणात उतरले होते, पण दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला होता. 

 पक्ष बदलल्यानंतर गुप्ते 2017 मध्ये भाजपच्या तिकिटावर रिंगणात उतरले आणि विधानसभेत पोहोचले. सपा उमेदवार तेज नारायण पांडे हे पवन लखनौ विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणाचे उत्पादन आहे. 2012 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना अयोध्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्यांनी निवडणूक जिंकली. 1991 नंतर अयोध्येत भगवा ब्रिगेडचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ होती, परंतु 2017 च्या निवडणुकीत सपाच्या तिकिटावर पराभव झाला. पुन्हा एकदा सपाने त्यांना या व्हीआयपी जागेवरून उमेदवारी दिली आहे. बसपाचे उमेदवार रवी मौर्य हे पक्षाच्या कॅडरचे नेते आहेत. 

 ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, त्यामुळे काँग्रेसकडून रिता मौर्य यांचीही ही पहिलीच राजकीय कसोटी आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि सपा नेहमीच आमनेसामने राहिले आहेत. यावेळीही या दोघांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि बसपा तिरंगी करून मुख्य लढतीत उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. जुन्या पिढीतील नेत्याची ओळख असलेले भाजपचे उमेदवार वेदप्रकाश गुप्ता हे विनम्र, मितभाषी आणि मनमिळाऊ आहेत, मात्र गेल्या पाच वर्षांत सर्वसामान्य मतदारांमध्ये फारसे बोलके झाले नाहीत.

बनारस उर्फ काशी उर्फ वाराणसी मराठी नातं

बनारस उर्फ काशी उर्फ वाराणसी... या प्राचीन अध्यात्मिक, सांस्कृतिक शहराशी मराठी मंडळींचे नाते अनेक शतकांपासूनचे. याच वाराणसीच्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होम ग्राउंडवरील रणधुमाळीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील एक महिला नेता प्रभावी भूमिका निभावत आहे... त्यांचे नाव विजया रहाटकर. भाजपच्या राष्ट्रीय सचिव, महाराष्ट्र महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व औरंगाबादच्या माजी महापौर असलेल्या विजया रहाटकर इथे वाराणसीत तळ देऊन बसल्या आहेत. फक्त वाराणसी नव्हे, तर या विभागातील नऊ जिल्ह्यांमधील महिला कार्यकर्त्यांच्या समन्वयाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर साहित्यकार, कलाकार, डाॅक्टर, प्राध्यापक, उद्योजक यासारख्या प्रभावशाली मतदारांशी संवाद साधण्याची जबाबदारीही पक्षाने त्यांच्याकडे सोपविली आहे. वाराणसीला मुक्काम हलवण्यापूर्वी त्या लखनौ, अयोध्या, प्रयागराजमध्ये बसून समन्वयाची जबाबदारी पार पाडत होत्या. सुमारे महिनाभरापासून त्या उत्तर प्रदेशात आहेत. वाराणसीतील एका हाॅटेलमध्ये त्यांची भेट झाली, तेव्हा त्या विविध बैठकांमध्ये व्यस्त होत्या.त्यांनी संवाद साधला. मोदी-योगी डबल इंजिन सरकार पुन्हा येणार असल्याबद्दल त्या अगदी ठाम आहेत. त्या म्हणाल्या, "गेल्या पाच वर्षांत योगी सरकारने उत्तर प्रदेशचा चेहरामोहरा बदलून टाकलाय. जीडीपी दुप्पट झालाय. कोरोनाच्या संकटातही बेरोजगारीचा दर १७ टक्क्यांवरून फक्त ४.५ टक्क्यांवर आलाय. हे राज्य देशातील दुसरया क्रमांकाची अर्थव्यवस्था बनले आहे. या ही पलीकडे जाऊन कणखर कायदा व सुव्यवस्था हे योगी सरकारचे सर्वांत बलस्थान राहिले आहे. जनतेला समाजवादीचे गुंड नको आहेत."
यूपीत पुन्हा भाजपला यश मिळवून देण्यात महिला सर्वाधिक पुढे असतील, असेही त्या म्हणाल्या. त्याचे कारण सांगताना त्या म्हणाल्या, "दीड कोटी घरांमध्ये वीज कनेक्शन, ४० लाख गरीबांना घरे, २९ लाख घरांमध्ये नळाने शुद्ध पाणीपुरवठा, सुमारे एक कोटी जनधनची खाती, उज्ज्वला योजनेचा लाखोंना लाभ यामुळे महिला मोदींसोबत आहेत. योगींनी त्या सुरक्षा दिलीय. कोरोना काळात मोदी सरकारने दिलेल्या मोफत धान्यांमुळे महिला समाधानी आहेत."