काश्मिर फाईल्स या चित्रपटाबद्दल दिवसाला सरासरी पाच पोस्ट तर नक्की वाचल्या असतील. खरंतर विवेक रंजन अग्निहोत्रीचा बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम आणि द ताश्कंत फाईल्स बघितल्यानंतर बॉलिवूडच्या चौकटी लांघणारा हा दिग्दर्शक आहे, आणि दिग्दर्शकाच्याही पलीकडे त्याचा काहीतरी वेगळा दृष्टिकोन आहे, सिनेमा हे माध्यम हाताळण्याची त्याची हातोटी वेगळी आहे याची खात्री पटली होती आणि त्यामुळेच काश्मिर फाईल्स या चित्रपटाबद्दल कुतूहल होतं.
भ्रमंती हा आपला आवडीचा छंद असल्याने १५ मे २०१८ रोजी काश्मीर फिरण्याचा योग आला. निसर्ग संपन्न असलेला हा परिसर प्रत्येकालाच खुणवतो. इथला इतिहास अंगावर शहारे आणतो. काश्मीर ही सर्वांची अस्मिता आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत काश्मीर हे शब्द जरी ऐकले आपलं देश प्रेम उफाळून येते. यावेळी काश्मीर मधील मराठी प्रशासकीय सेवेतील अधिकारी सागर डोईफोडे यांच्या घरी जाण्याचा योग आला. त्यांनी त्या ठिकाणी केलेला पाहुणचार आजही स्मरणात आहे.
त्यावेळी आपला मराठी प्रशासकीय अधिकारी काश्मीरकडे कोणत्या नजरेने पाहतात.. हे पत्रकार म्हणून निरीक्षण केले. मला निसर्गसंपन्न वाटणारा काश्मीर त्यादिवशी तेथील विकास, इतिहास, रूढी परंपरा, तेथील परिस्थिती पाहता वेगळा समोर आला. भारतीय सैनिकांनी दिलेला कडेकोट बंदोबस्त तेथील इतिहासात आपल्याला घेऊन जातो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या द काश्मीर फायल्सने पुन्हा एकदा इतिहासाकडे नेले. गुलमर्गच्या व्हॅलीमध्ये घोड्यावर बसून जात असताना घोड्याचा पाय घसरला.
मी एका साईटला पडलो. खूप घाबरलो होतो. मात्र सुदैवाने कोणतीही वाईट घटना घडली नाही. आजही ती घटना आठवली तरी अंगावर शहारे येतात. आम्ही घोड्यावर बसून बर्फवृष्टी पाहायला आम्ही चाललो होतो. त्यानंतर काही दिवसांनी गुलमर्गमधील याच महादेवाच्या मंदिरात आपले पाच आमदार जाणार होते. श्रीनगर रस्त्यावरून जाताना बाॅम्बस्फोट झाला. सुदैवाने सर्वजण बचावले. या मंदिरात जय जय शिवशंकर या गाण्याचे शुटिंग झाले आहे.
१९/२० जानेवारी १९९० उगवलेच नसते तर बरं झालं असतं असं वाटावं इतकी नृशंस कत्तल हिंदूंची झाली आणि उर्वरित देशाने ती मूकपणे पाहिली. काश्मीर खोऱ्यातल्या हिंदूंचे अस्तित्व पुसण्याचा आणि पुरोगामी फाईलींमधे बंद करून टाकलेला हा रक्तरंजित इतिहास ,आज बत्तीस वर्षांनी देशासमोर ठेवला गेलाय. ज्ञानाची गंगोत्री असलेलं, विद्येचं शक्तिपीठ असलेलं काश्मीर वामपंथी इकोसिस्टीमने पद्धतशीरपणे हिरवं रंगवून देशापासून तोडलेलं राहील याची काळजी कशी घेतली हे चित्रपट पाहताना जाणवतं आणि प्रचंड राग राग होतो. “फ्री कश्मीर”, “आजादी”, “अफझल हम शर्मिंदा है ” म्हणणारी लालहिरवी पिलावळ कशी पोसली जाते हेही या चित्रपटाने पुन्हा एकदा दाखवून दिलंय.
या दहशतवादी प्रयत्नांना पाठिंबा देणारी इनव्हिजीबल आर्मी म्हणजे लुटीयन मिडीया, भारताच्या सेनेचं मनोबल खच्ची करणारी तेव्हाची शासनसंस्था, किडामुंग्यांपेक्षाही वाइट पद्धतीने मारले गेलेले काश्मीरी पंडित मोठ्या पडद्यावर बघताना अंगाचा थरकाप उडतो आणि डोळ्यातून पाणी ओघळतं. वर्षानुवर्ष मागच्या सरकारांनी विविध फाईल्समधे दडवलेलं हे भीषण सत्य, वास्तवात घडून गेलेलं क्रौर्य आपल्यासमोर ठेवताना अग्निहोत्रीने ताश्कंद फाईल्सप्रमाणेच फुलप्रुफ काम केलंय.
आज जेएनयू सारख्या संस्थांमधून देशविरोधी विखार,फुत्कार कसे जोपासले जातात आणि तथाकथित बुद्धिवादी प्राध्यापक मंडळी त्याला खतपाणी कशी घालतात हेही ठळकपणे जाणवतं. वर्षानुवर्षे याच तथाकथित उदारमतवादी बुद्धिवादी लोकांनी काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराबद्दल न बोलणं अथवा खोट्या कथा पसरवण्याचं काम केलं. म्हणूनच “जब तक सच जुते पहनता है, तब तक झूट नंगे पाँव गाव घुम आता है” याचा प्रत्यय आपल्याला काश्मीर प्रकरणात आलेला आहे.
एकीकडे काश्मिर ही एक जखम आहे म्हणत असताना तेच काश्मिर पृथ्वीवरचं नंदनवन आहे, स्वर्ग आहे, सौंदर्य आणि निसर्गाच्या चमत्कृतींचा भव्य असा देखावा आहे हे ही ऐकत मी मोठी झाले. त्यामुळे पहिल्यापासूनच काश्मिर बद्दल एक अगम्य गूढ आणि अनामिक ओढ अशा दोन्ही भावना मनात होत्या.
दिगंबर दराडे
18 मार्च 2022
पुणे
Great sir .....
ReplyDeleteअप्रतिम Sir jii.....
ReplyDelete