Wednesday, May 30, 2018

ग्रामीण भाजपचा मुंडे-फुंडकर आवाज

पाडुरंग तथा भाऊसाहेब फुंडकर, राज्याचे कृषी मंत्री. भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष. अकोला लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा लोकसभेत पक्षाचे प्रतिनिधीत्व केले. राज्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि भाऊसाहेब फुंडकरांनी गावा गावात भारतीय जनता पार्टी पोहचवली. सरकार मध्ये असो अथवा नसो हे दोन नेते सदैव ग्रामीण महाराष्ट्रावर जादू करत राहिलं. मुंडे यांच्या पाठोपाठ फुंडकर साहेब ही गेल्याने पोकळी निर्माण झाली आहे.


पांडुरंग तथा भाऊसाहेब पुंडलिक फुंडकर हे वभारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. फुंडकर हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नवव्या, दहाव्या आणि अकराव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. पांडुरंग फुंडकर हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षही होते. सध्या ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात कृषीमंत्री म्हणून कार्यरत होते.

फुंडकर यांच्या राजकीय कारकिर्दीला जनसंघापासून प्रारंभ झाला. आणिबाणीविरोधी आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे त्यामुळे तुरुंगात जावे लागले. पुढे त्यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. त्यांनी कापसाच्या दरासाठी खामगाव ते आमगाव अशी पदयात्रा काढली होती.
अकोला लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडले गेले. राजीव गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसची प्रचंड लाट असतानाही पुढील निवडणुकीतही अकोला लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळविला.
यानंतर युती सरकारच्या काळात कापूस पणन महासंघाच्या मुख्य प्रशासकपदी नेमणूक झाली. त्याच काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते सतत तीन वर्षे कार्यरत होते. त्यांनंतर त्यांची विधान परिषदेवर नियुक्‍ती झाली आणि विरोधी पक्षनेते पद मिळाले. उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार देखील फुंडकर यांना मिळाला आहे.

भाजपमध्ये खूप काही सोसलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसमध्ये यावे यासाठी केंद्रात व राज्यात दोन मंत्रीपदे देऊ केली गेली होती. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘भगवा टिळा’ लावून मुंडे यांना रोखले, असा खळबळजनक गौप्यस्फोट मुंडे यांचे निकटचे सहकारी व भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांनी  विधान परिषदेत केला होता. मुंडे यांच्या मृत्यूची वैद्यकीय कारणे वेगवेगळी सांगितली गेली व अपघातानंतर ५० मिनिटांमध्ये त्यांचे निधन झाल्याने याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणीही फुंडकर यांनी केली होती.

मुंडे यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘कृतज्ञता’ प्रस्तावावर विधान परिषदेतील चर्चेत बोलताना फुंडकर यांना आपल्या भावना आवरता आल्या नव्हत्या.  मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले होते. मुंडे यांनी बरेच काही सहन केले आहे. त्यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्यासाठी ‘ऑफर’ देण्यात आली होती. ते शिवसेनाप्रमुखांना भेटले. पण त्यांनी पक्ष सोडू नको, असा सल्ला दिला. त्यांनी आम्हालाही विचारल्यावर मीही विरोध केला होता. त्यामुळे ते बारगळले. त्यानंतर जेव्हा त्यांच्यावर अपमानित होण्याचे प्रसंग आले, तेव्हा हेच पाहण्यासाठी मला थांबवले होते का, असे ते विचारत असत. त्यावेळी व आता निवडणुकीच्या वेळीही त्यांची कोंडी झाली होती. अनेक सुखदु:खाच्या प्रसंगात मी त्यांची साथ दिली. आता त्यांना चांगले दिवस आले होते. केंद्रात मंत्रीपद मिळाल्यावर सत्तारूढ बाकांवर बसण्याची संधी मिळाली, पण हे दिवस पाहण्यासाठी ते राहिले नाहीत, असे फुंडकर बोलल्यानंतर सर्वजन भावुक झाले होते. दोन्ही मित्रांना एकमेकांची दु:ख फार चांगल्या प्रकारे समजत होते.

Monday, May 28, 2018

‘गडकरी’ साहेब ‘रोडकरी’ कंपन्यांनी पुणेकरांना झुलवले

पुणे-सातारा, पुणे-नाशिक, पुणे-नगर याच बरोबर रखडलेले पालखी मार्गाची कामे यामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्ते बांधणी करणार्‍या कंपन्यांना अनेक वेळा कारणे दाखवा नोटीस पाठवूनही त्यांची मनमानी कमी होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, या मार्गांच्या रखडलेल्या कामांमुळे अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. देहू रोड ते कात्रजदरम्यान वेगवेगळ्या अपघातात आतापर्यंत ११० जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम १२ वषार्र्ंपासून सुरूच आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच टोलवसुलीचा दणका दिला आहे. पुणे सातारा महामार्गाच्या देहू रोड ते सातारा या १४० कि.मी.च्या चौपदरीकरणासाठी १९९९ मध्ये ६० मीटरचे भूसंपादन केले. २००४ मध्ये चौपदरीकरणाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली. हे काम पूर्ण झाल्यावर २०१० मध्ये सहापदरीकरणाचे काम सुरू झाले.

डिझाईन बिल्ट फायनान्स ऑपरेट अँड ट्रान्स्फर या तत्त्वावर केंद्राने रिलायन्स इन्फा कंपनीला या कामाचा १७२४ कोटी रुपयांचा ठेका दिला. त्याबदल्यात शिवापूर व आणेवाडी येथील टोलवर २०३४ पर्यंत टोलवसुलीची परवानगी देण्यात आली आहे. परंतु तब्बल बारा वषार्र्ंपासून हे काम सुरू आहे. अद्यपही ते अपूर्णावस्थेत असल्याने  या रस्त्यावरून गाडी चालविणे फार अवघड आहे. मूळ ठेकेदारांच्याकडून कामाची रक्कम न मिळाल्याने सब ठेकेदारांनी पळ काढल्याच्या घटनादेखील उघडकीस आल्या आहेत. या कंपनीला अनेक वेळा नोटिसादेखील धाडण्यात आल्या आहेत. तरी देखील अद्याप कामे रडखडत सुरू आहेत. विशेष म्हणजे काम रखडल्याचं खापर रिलायन्सनं नॅशनल हायवे ऍथोरिटीवर फोडलं आहे.

पुणे-नाशिकला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० चंडोली (राजगुरुनगर ते सिन्नर) या रस्त्याचे काम सुरू आहे.२०१२ पासून हे काम सुरू असून, १३५  किमीसाठी १९६८ कोटींची तरतूद केली आहे. हे काम आय एल ऍन्ड एफ एस कंपनीला देण्यात आले आहे. मागील चार वषार्र्ंपासून हे काम सुरू आहे. मागील वषार्र्ंत केवळ पाच टक्के काम पूर्ण झाले आहे. आता उरले आहे ते १५ ते २० टक्केच काम. हे काम रखडल्याप्रकरणी रिलायन्स इन्फ्रावर मात्र काहीच कारवाई झालेली नाही. केवळ रिलायन्स इन्फ्राला या कामातून टर्मिनेट करावे, असा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्गा रस्ते प्राधिकरणने दिला होता, पण त्याचे पुढे काही झालं नाही. रिलायन्स इन्फ्राला टोलमधून मिळणारा हिस्साही तात्पुरता बंद केला होता. दंडात्मक कारवाई झाली नाही. परिणामी मागील आठ वर्षे वाहन चालक त्रास सहन करत आहेत.