काही शब्द प्रत्येक माणसाला चिकटलेले असतात. असाच एक शब्द गोपीनाथ मुंडे साहेबांच्या देखील नावाला चिकटला होता. बहुतेक या वाटेची सुरुवात पुन्हा एकदा झालेली दिसत आहे. याची कारण काही असतील संघर्ष मात्र तोच असणार आहे. संघर्ष माणसाला मजबूत बनवतो. असचं काही माणसाकडे पहिल्यानंतर वाटत. राजतिलकपण त्याच कापळावर शोभून दिसतो. अशाच संघर्षाने गोपीनाथ मुंडे साहेबांना मजबूत केले होते. महाविद्यालयीन जीवनापासून राजकरणात असणा-या गोपीनाथ मुंडे यांनी नेहमीच अन्याया विरुध्द संघर्ष केला. जनतेचे प्रश्न घेऊन सत्ताधा-यांविरोधात लढणारा नेता अशी गोपीनाथ मुंडे यांची ओळख झाली.
एका सामान्य शेतकरी कुटुंबात मुंडे यांचा जन्म झाला होता. गोपीनाथ मुंडे यांचे आई-वडिल वारकरी होते. मुंडे यांनी बालपणी गरीबी अनुभवली होती. एका सामान्य शेतक-यांच्या घरात जन्मल्याने शेतक-यांचे प्रश्न काय असतात याची त्यांना चांगली जाणीव होती. म्हणूनच नेहमीच त्यांनी शेतक-यांच्या प्रश्ननावरुन सत्ताधा-यांविरोधात रान उठवले. शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. जिल्हापरिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री या प्रवासात सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर जुळलेली नाळ त्यांनी शेवटपर्यंत कायम टिकवून ठेवली. दांडगा लोकसंपर्क हे गोपीनाथ मुंडे यांचे आणखी एक वैशिष्टय. फक्त बीड जिल्ह्यामध्येच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रात मुंडे यांचे नेतृत्व मानणारा एक मोठा वर्ग होता. या वर्गाला मुंडे यांच्या वर झालेला अन्याय कधीच सहन होत नसे.
साहेबानच्या वर अन्याय करण्याची काय कोणामध्ये हिंमत होती. याच कारण त्यांना गरिबांच्या प्रश्नानी मजबूत केले होते. पत्रकारांनापण या नेत्याच खूप कौतुक होते. बहुतेक पत्रकारांना नेत्यांचे कौतुक नसते. याला अपवाद मुंडे साहेब होते. एका कार्यक्रमात साहेबाच्या गाडीत एवढे लोक बसले की त्या गाडीत त्यांना बसायला जागा राहिली नाही. त्यावेळी साहेब बोले या गाडीचे मालक ते आहेत. अनेक मोठी माणसं गाडी किती जपतात आपण ते पहायल आहे. मात्र मुंडे त्याला अपवाद होते. साहेब नेहमी बोलत सामान्य माणूस माझी ताकद आहे. अनेकांच्या जीवनात पद येतात जातात..मात्र मुंडे साहेबांच्यामुळे सामान्य माणसाला मोठी पद छोटी वाटू लागली. जसं सचिन खेळत असताना शोएब अखतर देखील गल्लीतील बॉलर वाटत असत. तशीच अवस्था राजकीय पदांची झाली होती. संघर्षापुढे पद उजळली होती. १९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर असताना, मुंडे यांच्याकडे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्रीपद होते. राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा एक अमीट ठसा उमटवला होता.
भाजपची सुरुवातीला ब्राम्हणी चेहरा असलेला पक्ष अशी ओळख होती. पण भाजपची ही ओळख सर्वाथाने बदलण्याचे संपूर्ण श्रेय मुंडे यांना जाते. त्यांनी भाजपला महाराष्ट्रात तळा-गाळात रुजवले. समाजातल्या वेगवेगळया घटकांना भाजपसोबत जोडले. महाविद्यालयीन जीवनात प्रमोद महाजन यांच्याशी मैत्री झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या मुंडे-महाजन जोडीने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत भाजपला तळागाळात रुजवले. माझ्या एका पुण्यातील मित्रानी मुंडे लोकसभेला पडणार अशी पैज लावली होती. त्यावेळी मी मुंडे 1 लाख मतांनी निवडून येतील असं सांगितले. त्यावेळी मुंडे साहेबाना एकटे पाडण्याचे प्रयत्न झाले होते. यामध्ये स्वकीय देखील होते आणि विरोधकपण होते. तरी मुंडेची मत का वाढली असा प्रश्न राजकीय तज्ञांनी निर्माण केला. जेव्हा ते पडत त्यावेळी त्यांची ताकद सामान्य जनता होत. जनता पेटून उठत. लोकांच्या प्रेमापुढे साहेबांच डोक चालत नसे.
रात्री 2 वाजता कार्यकर्ते भेटत असत. का आलेत असे विचारलं की कार्यकर्ता बोलायचा साहेब तुम्हाला भेटायाला आलो. साहेब बसा बोले की ताकद याची. याच लोकांनी बीडमधुन मोठया मताधिक्क्याने विजय मिळवून दिला. राजकरणातील मुंडेची ताकद दाखवून दिली.
ग्रामीण भागात काम केल्याने मुंडे यांना ग्रामीण जनतेच्या समस्या चांगल्या माहिती होत्या. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याकडे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयासारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली होती. मुंडे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत धडाक्यात कामाला सुरुवातही केली होती. यावेळी साहेबाना विरोधक ही फोन करत होते. त्यांना साहेब गंमतीने बोलत असत..आता तुमच्यावरील अन्याय दूर करणार.. मात्र दुर्देवाने या कार्यक्षम नेत्याला एका रस्ते अपघाताने आपल्यापासून हिरावून घेतले. त्यावेळी देखील संघर्षाचा तिलक कपाळी कायम राहिला.

No comments:
Post a Comment