Friday, May 20, 2022

साहस, संयम, संघर्ष म्हणजे ''रोहित''


पुण्यातील एका मित्राच्या घरी  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित (दादा) पाटील यांची भेट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी दिवंगत नेते रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील उर्फ आबा यांचा रोहित हा मुलगा 

 8 नोव्हेंबर 2014 रोजी आर. आर.पाटील यांचं निधन झालं. त्यांची राजकीय कारकीर्द मोठी होती. जिल्हा परिषद सदस्य ते सहा वेळा आमदार, ग्रामविकासमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री ते अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर रोहित पाटील यांच्याकडे  पक्षाकडून स्वतंत्र राजकीय जबाबदारी देण्यात  आली आहे.

आबांनी कामातून नावलौकिक मिळवला. सर्वसामान्य माणसाची नाळ आबांच्याबरोबर कायम जोडलेली राहिली. एवढा मोठा वारसा घेऊन रोहित त्याच वाटेने पुढे चालत आहे. शिक्षण चालू असतानाच आपल्या वडिलांचे निधन होणे.  ते दुःख पचवत जनतेचे प्रश्न सोडवत राहणं किती कठीण असते. हे तेच सांगू शकतात. कॉलेज विषयाच्या गप्पा झाल्यानंतर मतदारसंघातील विविध विषयावर चर्चा झाली. मतदारसंघातील विविध प्रश्नांची खडानखडा माहिती रोहितला आहे.  तासगाव परिसरात द्राक्षचे मोठे उत्पादन घेण्यात येते. दहा हजार पेक्षा जास्त हेक्टरवर द्राक्षे पिकवली जातात. या द्राक्षाला आता जगाची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

 आमचा शेतकरी किती मेहनती आहे हे रोहित अतिशय अभिमानाने सांगतो. आबांचे आणि सर्वसामान्य शेतकरी माणसाचं नातं असंच होतं. गावातील प्रत्येक माणसाला आबा आपला माणूस वाटत होते. आबा भाषण करायला आल्यानंतर आपल सगळं दुःख आबाला माहित आहे याची जाणीव भाषण ऐकणाऱ्या प्रत्येक माणसाला होत होती. रोहितच देखील सेम आबांसारख आहे.  रोहित बोलत राहावा आणि आपण ऐकत राहावे. अशीच भावना आपली होते. कवठेमहाकाळच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी रोहितवर बापाची पुण्याई असल्याचा आरोप केला होता. निवडणुकीनंतर तुम्हाला माझा बाप आठवलं असे ठणकावून सांगणारा रोहित खूप संयमी आहे. रोहित पाटील सोशल मीडियावर सुद्धा सक्रिया असतात.

 इन्स्टाग्रामवर त्यांचे 83 हजार फॉलोअर्स आहेत. तर ट्वीटरवर त्यांचे 32 हजार फॉलोअर्स आहेत. त्यांचं वय कमी असेल त्यामुळे गेल्यावेळी त्यांना संधी दिली नसेल. रोहित हा लोकांमधील युवा कार्यकर्ता आहे. रोहित जनतेत मिसळणारा कार्यकर्ता आहे.  घराणेशाही नाही तर रोहितच कर्तुत्वच त्याला महाराष्ट्राचा नेता बनवेल.

Saturday, April 23, 2022

महाराष्ट्राच्या समृद्धीचा राजमार्ग

 


महाराष्ट्र विकास महामंडळ राज्य मार्ग (MSRDC) नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी अवघ्या दोन अडीच वर्षातच सज्ज झाला. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम यांचा समावेश आहे. विदर्भाला बहुसंख्य ठिकाणी अत्यंत वेगवान प्रवासाचा पर्याय प्रथमच मिळाला. 
नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार हा 210 किमीचा रस्ता तयार झाला. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे दोन मे रोजी उद्घाटन होणे हे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल. 

अनेकदा जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करताना वाहने संथ गतीने चालवली जातात. कोणताही वन्य प्राणी रस्त्यावर आला तर त्याला कोणतीही हानी होऊ नये असा हेतू  असतो. पण आता देशात असा हाय-स्पीड हायवे बनवला जात आहे, ज्यामध्ये वनक्षेत्राजवळ अंडरपास आणि पूल बांधले जातील. जेणेकरून वन्य प्राणी इकडून तिकडे जाऊ शकतील. भारतात हे पहिल्यांदाच घडत आहे.

हा देशातील पहिला सर्वात वेगवान महामार्ग असेल. नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे असे त्याचे सुरुवातीला तांत्रिक नाव होते. ताशी 150 किमी वेगाने वाहने धावू शकतील अशा पद्धतीने ते तयार केले जात आहे. 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' असे नामकरण झालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट मुंबई आणि नागपूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी करण्याचे आहे. सध्या, दोन शहरांमधील प्रवासाची वेळ  16-18 तासांच्या दरम्यान आहे.

55,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे 70 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. सुमारे 701 किमी लांबीचा आणि 120 मीटर रुंद असलेला हा महामार्ग आहे. जानेवारी 2019 मध्ये बांधकामाला सुरुवात झाली. नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार हा 210 किलोमीटरचा रस्ता पहिल्या टप्प्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. एमएसआरडीसीने नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजारापर्यंत 210 किमी महामार्ग वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

 त्यानंतर डिसेंबरअखेर नागपूर ते शिर्डी हा 520  किलोमीटरचा महामार्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडीसीला  एक्स्प्रेस वेच्या बाजूने हिरवळ निर्माण करावी त्यामुळे लोकांना प्रवासाचा आनंद घेता येईल, अशा सुचना दिल्या. कलासक्त मनाच्या मुख्यमंत्र्यांची ही सुचना निसर्ग संवर्धनासाठी आणि प्रवाशांना हिरवाईचा अनुभव मिळावा यासाठी महत्त्वाची. 

अनेकदा जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करताना वाहने संथ गतीने चालवली जातात. जेणेकरून कोणताही वन्य प्राणी रस्त्यावर आला तर त्याला कोणतीही हानी होऊ नये. पण आता देशात असा हाय-स्पीड हायवे बनवला जात आहे, ज्यामध्ये वनक्षेत्राजवळ अंडरपास आणि पूल बांधले जातील. जेणेकरून वन्य प्राणी इकडून तिकडे जाऊ शकतील. भारतात हे पहिल्यांदाच घडत आहे.

तीन अभयारण्यांकडे जाण्यासाठी सुध्दा या समृद्धी महामार्गावरुन रस्ता मिळेल. यामध्ये तानसा (ठाणे), काटेपूर्णा (अकोला-वाशिम सीमा) आणि कारंजा सोहोळ (वाशिम) यांचा समावेश आहे. याशिवाय या मार्गावर 35 वन्यजीव फोकस क्षेत्रे असतील. त्यापैकी 16 विदर्भात, 16 उत्तर पश्चिम घाटात आणि 3 मराठवाड्यात असतील. ते सुमारे 118 किमीच्या अंतरात असतील. 

महामार्गाच्या बांधकामामुळे वन्य प्राण्यांचे जनजीवनही विस्कळीत झाले. त्यांना पूर्वीसारखे फिरता येत नाही. अशा परिस्थितीत या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने भारतीय वन्यजीव संस्थेशी समन्वय केला. या अंतर्गत वन्य प्राण्यांना भीती न वाटता किंवा जीव धोक्यात न घालता रस्त्यावरून फिरता यावे हा उद्देश आहे. या एक्स्प्रेस वेमध्ये 'वाइल्डलाइफ फोकस एरिया'  अंतर्गत पाच वन्यजीव पूल, विदर्भात तीन ओव्हरपास आणि औरंगाबादमध्ये दोन ओव्हरपास बांधले जातील. 

या महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्यातील 520 पैकी 360 किमीचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याची 'एमएसआरडीसी'ची योजना होती. मात्र, सेलूबाजार ते शिर्डीमधील काही पुलांची कामे अद्याप अपूर्ण राहिली. दोन पॅकेजमधील कंत्राटदार बदलण्याची वेळही 'एमएसआरडीसी'वर आली. परिणामी, पहिल्या टप्प्यात नागपूर ते सेलूबाजारपर्यंतचाच टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नंतर डिसेंबरपर्यंत नागपूर ते शिर्डी असा 520 किमीचा महामार्ग सुरू होईल.

Tuesday, April 19, 2022

कोल्हापूरला सहानुभूतीचे पारडे जड



महाविकास आघाडी सरकार व भाजपातील सत्तासंघर्ष पराकोटीचा झालाय. अशा परिस्थितीत कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीचाही महाराष्ट्रभर गाजावाजा झाला. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यांच्या प्रदेश अध्यक्षांच्या, चंद्रकांत पाटलांच्या प्रभावाचा, यश अपयशाचा मुद्दा यामागे होता. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. त्यांच्या पत्नी, भाजपाच्या माजी नगरसेविका जयश्री जाधव यांना बिनविरोध निवडून देण्याचे आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे होते. महाविकास आघाडीतील ठळक जाणवणारा समन्वय, जनतेच्या मनातील दिवंगत नेत्याबद्दलची समंजस सहानुभूती, आणि या मतदारसंघात जिवंत असलेला पुरोगामी काॅंग्रेस विचार यामुळे भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. 

विद्यमान आमदाराचे निधन झाले, आणि त्याच्या पत्नीने पतीचा पक्ष सोडत पक्ष बदल करत निवडणूक लढवली, तर यश मिळत नाही, इतके मतदार पक्के असतात, हे यापूर्वी खडकवासला सारख्या काही पोटनिवडणुकांत दिसून आले होते. कोल्हापूर मध्ये ६० टक्के मतदान झाले. त्यात विविध विचारांची मते असली तरी सहानुभूतीचे पारडे जड झाले हे नाकारता येणार नाही. 

 शिवसेनेने गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना पुन्हा उमेदवारी न देता काँग्रेसला पाठिंबा दिला. महाविकास आघाडी धर्माचे पालन केले. जाधव यांना ९६१७६ तर कदम यांना ७७,४२६ मते मिळाली. १८,७५० मतांची आघाडी महाविकास आघाडीला मोठे बळ देणारी ठरली. विशेषतः केंद्रीय तपास यंत्रणेचे आघाडीच्या नेत्यांवरचे संशय गडद करणारे, छापे व धाडसत्र ,कारवाईचा विळखा असताना हे यश तिन्ही पक्षांच्या ताकदीमुळे व 'शाहू नगरी'तील जनतेच्या मनातील सहानुभूतीमुळे मिळाले. 

भाजपने या निवडणुकीत हिंदूत्वाचा मुद्दा उचलून धरला होता. तर महाविकास आघाडीने शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार या निवडणुकीत विजय मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला होता. महाविकास आघाडीतील सर्वच जेष्ठ नेते तसेच युवा नेतेही प्रचारासाठी कोल्हापुरात होते. तसेच भाजपच्या बाजूने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात तळ ठोकून होते. 

 प्रचारासाठी बाहेरुन लोक आणले अशी टीका भाजपवर झाली. त्यावर चंद्रकांत पाटलांचे ' आमचे कुटुंब आहे कोणाच्याही घरी लग्न असले तरी आम्ही जातो.' हे उदगार काहीही झाले तरी ही लढत जिंकायची ही जिद्द दाखवून देणारे होते. २०१४ च्या निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार  व महादेवराव महाडिक यांचे नातेवाईक सत्यजित कदम यांना 'आयात' करून रिंगणात आणत भाजपने शर्थीचे प्रयत्न केले. रिपाइं, जनसुराज्य, सदाभाऊ खोत यांचा रयत पक्ष, गोपिचंद पडळकर यांचा समाज, शिवसंग्राम, आवाडे गट, महाडिक गट यांच्या खास मतांवरही भाजपची मदार होती. 

एखाद्या सदस्याचे जर निधन झाले तर त्या जागेवर होणारी निवडणूक बिनविरोध होते, अशी महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. येथे तसे झाले नाही अशी टीका महाविकास आघाडीतील नेते करत होते. तर आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्दयांवर लढली. पूर परिस्थिती, विमानतळ विस्तारीकरण हे विकासाचे मुद्दे असल्याचे चंद्रकांत पाटील सांगत होते. 

 पहिल्या फेरीपासून जयश्री पाटील यांना मिळालेली आघाडी पाहून अखेरीस पाटील यांनी पराभव मान्य केला. भाजपचे दोन खासदार होते, आता भारतभर आमचा पक्ष पसरला हे समाधान ( पराभव झाल्यानंतर भाजपकडून नेहमी व्यक्त होणारे) देखील व्यक्त केले.) 
 विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सहानुभूतीमुळे जयश्री जाधव यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

 कोल्हापूरचे पालकमंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील  'किंगमेकर' ठरले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व सेनेच्या नेत्यांना सोबत घेत चंद्रकांत पाटील यांना व महाडिक परिवाराला  शह दिला. कोल्हापुरात महाविकास आघाडीत मोठा समन्वय असल्याने हा विजय शक्य झाला, असे सतेज पाटलांचे म्हणणे आहे. 

सतेज पाटील  यांनी रचलेल्या व्यूहरचनेप्रमाणे आघाडीचे नेते उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नशील राहिले. तर हिंदुत्व, शिवसेनेचे संपवण्याचे उद्धव ठाकरेंचे प्रयत्न आणि गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्दा,यामुळे  भाजपाने निवडणूकीच्या प्रचार धार्मिक  मुद्याच्या वळणावर पोहचवला.

सतेज पाटलांची विजयानंतरची प्रतिक्रिया भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली हे मान्य करणारी आहे. ते म्हणतात, कोल्हापूर शहर पुरोगामी आहे हे दाखवून देण्याचे काम इथल्या नागरिकांनी केले. भाजपने विखारी प्रचार केला. ज्या प्रभागातून सर्वाधिक मतांची अपेक्षा होती तिथून आम्हाला कमी प्रतिसाद मिळाला. यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो यावर विचार करु. भाजपच्या मताचा टक्का वाढलेला सकृतदर्शनी दिसत असले तरी त्यात पुढे सातत्य राहणार नाही.

Friday, April 8, 2022

दिलवाले शहर का 'दिल भरा खाना'



प्रत्येक शहराची एक खाण्याची संस्कृती असते. तशी संस्कृती दिल्लीची देखील आहे. यमुनेच्या पाण्याची चव खाद्यसंस्कृती मध्ये पाहायला मिळते. दिल्लीमध्ये अनेक वेळा येणं-जाणं सुरू असतं. देशाची राजधानी दिल्ली आपले वेगळेपण सदैव असल्याचे चित्र पाहायला मिळते. महाराष्ट्र सदनच्या थाळी पासून ते कॅनॉट प्लेसच्या Sandoz पर्यंत, National पासून ते राजेंद्र दा धाबा ते बंगाली मार्केटपर्यंत, प्रेम ढाबा या ढाब्याचे बटर चिकन खूप प्रसिध्द आहे.

 इथले जेवण चविष्ट तसेच स्वस्त आहे आणि तुम्हाला इथे बसून खाण्याची सोयही मिळेल. विशेष बाब म्हणजे ते नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच आहे.राजिंदर दा ढाबा हे दिल्लीतील सर्वात जुन्या रेस्टॉरंटपैकी एक मानले जाते. त्याची नॉनव्हेज टेस्ट फक्त दिल्लीतच नाही तर भारताच्या अनेक भागात प्रसिद्ध आहे. तुम्हाला इथले बटर चिकन आवडेल. यासोबतच तुम्ही या ठिकाणी चिकन आणि मटणाचे इतर चविष्ट पदार्थ देखील ट्राय करू शकता.

गुलाटी रेस्टॉरंट हे दिल्लीच्या पंडारा रोड मार्केटमध्ये असलेल्या गुलाटी रेस्टॉरंटच्या बटर चिकनची गोष्ट खास आहे. असं म्हणतात की हे दुकान 1959 पासून सुरू आहे. येथील बटर चिकन खास असते. दरियागंज नाॅनव्हेडसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे अशी अनेक रेस्टॉरंट्स आहेत, जिथे तुम्ही बटर चिकनचा आस्वाद घेऊ शकता. हे ठिकाण राजेशाही थाटासाठीही ओळखले जाते.

दिल्लीच्या राजौरी गार्डन भागात 'ढाबा' हे एक खास रेस्टॉरंट आहे. तुम्ही इथे बटर चिकन आणि गार्लिक नॉन-टेस्ट देसी स्टाईलमध्ये ट्राय करू शकता. इथलं जेवण थोडं महाग आहे, पण चवीच्या बाबतीत या रेस्टॉरंट जोड नाही.
दिल्ली हाटमध्ये साबुदाणा वडा छान आहे, पण सोबत लसणीची चटणी देतात. बटाटेवडा पण ओके. बाकी थालपीठ, भाकरी, झुणका वैगरे तिथे खावं वाटलं नाही. कोकम सरबत मिळतं तिथे, ते मात्र ब्येस्ट.  बाकी आंध्राभवन मधले जेवण छान असते. व्हेज थाली मस्त आहे तिथली.. सोबत मेतकुटाचा भाऊ शोभेल असा एक पदार्थ येतो, 
नॉन व्हेज खात असाल तर तिथली चिकन चेट्टिनाड ही डीश खाच. जेवण झाल्यावर मस्त पान वैगरे मिळते. गुजराथी थाळीसाठी राजधानी, कॅनॉट प्लेस अन गुडगावमध्ये आहे..

 बहुतेक नोयडा मध्ये पण असेल. चांगलं जेवण अन चांगली सर्विस... अशीच एक सुरुची नावाची जागा आहे करोलबागमध्ये, तिथे गुजराथी अन राजस्थानी जेवण मिळतं... एकदम छान चव.. आहे. याव्यतिरिक्त रात्री बेरात्री उशिरा जेवायचं असेल तर पंडारा रोड चांगली जागा आहे. कढी चावल / राजमा चावल साठी कॅनॉट प्लेसवर रोडवर काके का ढाबा टाइपच्या एक्-दोन जागा आहेत. त्या पण चांगल्या आहेत.

दिगंबर दराडे
दिल्ली 7 एप्रिल 2022

Sunday, March 20, 2022

उजनीच्या भेटीला ''दो परदेशी''



मुबलक पाणी, जमिनीची सुपीकता यामुळे  उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेती बहरली आहे. मुख्य म्हणजे उजनी धरण व या धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी आणि पक्षी पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. यामुळे या क्षेत्रात अनेक कृषि पर्यटन केंद्र विकसित होत आहेत. आपण जेव्हा दुसऱ्या देशांमध्ये जातो. त्यावेळी आपल्या देशा विषयी आणखी अस्मिता जागी होते.

 डब्लिंगचे मित्र काहील यांच्याबरोबर रविवारी सकाळी उजनी चे पर्यटन केले. लहानपणापासूनच ...उजनी पहात आल्यामुळे फारसं आकर्षण मला असण्याचे काही कारण नाही. मात्र परदेशी पाहुण्यांना त्या ठिकाणी परदेशी पक्ष्यांचे दर्शन झाल्यामुळे त्यांना मनापासून आनंद झाला. तो आनंद पाहण्यासारखा होता. शाळेतील मित्र संतोष देवकाते यांनी या ठिकाणी उजनी या नावाने हॉटेल सुरू केले आहे. उजनीची भ्रमंती झाल्यावर उजनीतील मासे उजनीमध्ये खाण्यामध्ये वेगळी मजा आली.

 बहुतांश पक्षी रशियन सैबेरिया, काही पक्षी हिमालय, पूर्व युरोप आणि आफ्रिकेतून येतात. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातल्या भीमानगर (ता. माढा) या गावाजवळ आहे. या धरणाचे पाणी पुढे कर्नाटक राज्यामध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते. उजनी हे महाराष्ट्रातील जायकवाडी धरणानंतर सर्वात मोठे धरण आहे. सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील अर्थकारण व राजकारण यावर अवलंबून आहे. 

उजनी धरणाच्या माध्यमातून सुमारे २५००० कोटी रूपयाची उलाढाल होते. पर्यटनाच्या बाबतीत महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे दरवर्षी आवर्जून येणारे देश विदेशी हजारो पक्षी. यामुळे उजनी बॅकवॉटर जलाशय हा पाणपक्ष्यांसाठी देशात प्रसिद्ध पावत आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून या बॅक वॉटरच्या क्षेत्रात काही पर्यटन केंद्र विकसीत होत आहेत. 

उजनी धरण हे पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यास वरदायिनी ठरले असून या धरणावर परिसराचे विकास, अर्थ तसेच राजकारण अवलंबून आहे. धरणातील पाण्यावर ४४ सहकारी व खाजगी साखर कारखाने, १५ औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपूरक उद्योग अवलंबून असून, दरवर्षी ३० हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम बनला असून कृषि धवल औद्योगिक क्रांती झाली आहे.

 धरण क्षेत्र संरक्षित ठेवून इतर परिसर पर्यटन केंद्रम्हणून नियोजनबद्ध पद्धतीने विकसित करणे गरजेचे आहे. धरणाला लागून पुणे सोलापूर, जलाशयास समांतर टेम्भुर्णी ते नगर राष्ट्रीय महामार्ग, दक्षिण व उत्तर भारताला जोडणारी रेल्वे वाहतूक जेऊर, कुर्डुवाडी व भिगवण स्टेशन मार्गे आहे.  पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, जेजुरी, मोरगाव, दहिगाव, नरसिंहपूर या तिर्थक्षेत्रास दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. उजनी फुगवट्यावर क्रौंच, रोहित, बदके आदी ३५० प्रकारचे पक्षी, चिलापी, रोहू, कटला, वाम, मरळ आदी १५ प्रकारचे मासे यासह विविध पक्ष्यांचे वास्तव्य असते. यातील बहुतांश पक्षी रशियन सैबेरिया, काही पक्षी हिमालय, पूर्व युरोप आणि आफ्रिकेतून येतात.

उजनी माश्यांचा ब्रँड महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगाल येथे निर्माण झाला असून भिगवण, इंदापूर ही ठिकाणे मत्स्य केंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. उजनी पट्ट्यात मत्स्य अभ्यास,पक्षी निरीक्षण, वनस्पती अभ्यास केंद्र, प्राणी संग्रहालय, खाद्यमॉल उभारून पर्यटकांना आकर्षित करणे शक्य असून त्यातून रोजगार निर्मिती होऊन अर्थकारण देखील मजबूत होऊ शकते. मात्र परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच त्यांच्या शेती व्यवसायास धक्का न लावता पर्यटनकेंद्र विकसितझाल्यास देश परदेशातील पर्यटक या परिसराला भेटी देतील मात्र त्यासाठी नेत्यांची जबरदस्त इच्छा शक्ती हवी.

स्थानिकांना रोजगार मिळेल... उजनी जलाशयावर वर्षभर वेगवेगळ्या खंडातून पक्षी येत असतात. यामुळेदेखील पर्यटन व्यवसाय वाढेल, तसेच राष्ट्रीय महामार्गावर उजनी धरण    असल्याने हॉटेलिंग व्यवसायही निसर्गरम्य वातावरणात नावारूपाला येईल. रोजगारात वाढ होईल व संबंधित विभागाला पर्यटनाच्या माध्यमातून महसूल गोळा होईल, असे उजनी हॉटेलचे मालक संतोष देवकाते यांनी सांगितले यांनी सांगितले

. तर रोजगारनिर्मिती व्हावी, गर्दी वाढावी, खाजगी उद्योग आणि रोजगार यांचा ताळमेळ घालून उजनी परिसराचा विकास झाला पाहिजे त्यासाठी उजनी धरणावरील पर्यटन क्षेत्राला लवकरात लवकर डेव्हलप करणे गरजेचे बोट व्यवसायिक सचिन देवकाते यांनी सांगितले.

दिगंबर दराडे
पुणे  21मार्च 2022

Friday, March 18, 2022

राजस्थानचा "चंग"

 

राजस्थानच्या होळीमध्ये चंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा चंग वाजवत राजस्थानी बांधव होळीचा सण साजरा करतात. प्रामुख्याने यामध्ये चंग वाजवत वाजवत गाण्याच्या तालावर सर्वजण गातात. धुलीवंदनाच्या दिवशी पुण्यातील राजस्थानी बांधवांनी आणि माझे मित्र मगराज राठी यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  महाराष्ट्रात हलगी वाजवली जाते. हलगी छोटी असते. चंग मात्र मोठा असतो.

 हा चंग सर्वजण एका तालात वाजवतात.  प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील संस्कृती समजून घेताना एक वेगळी मजा येते. महाशिवरात्री नंतर हे चंग बाजारात दिसायला लागतात. बाजारातून, गली-मोहल्लों मे चंगच्या थापेवर  होळीची गाणी गात महिला आणि पुरुष नृत्य करत असतात.

होळी हा रंग आणि हास्याचा स जेण आहे.  हा भारतातील एक प्रमुख आणि प्रसिद्ध सण आहे, जो आज जगभरात साजरा केला जात आहे. हा सण, ज्याला रंगांचा उत्सव म्हणतात, पारंपारिकपणे दोन दिवस साजरा केला जातो.  तो प्रामुख्याने भारत आणि नेपाळमध्ये साजरा केला जातो.  हा सण इतर अनेक देशांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो ज्यामध्ये अल्पसंख्याक हिंदू लोक देखील राहतात.  पहिल्या दिवशी होळी पेटवली जाते, ज्याला होलिका दहन देखील म्हणतात.  दुस-या दिवशी, ज्याला मुख्यतः धुलेंडी आणि धुरडी, धुरखेल किंवा धुलिवंदन या नावाने ओळखले जाते.

लोक एकमेकांवर रंग, अबीर-गुलाल इत्यादी फेकतात, ढोल वाजवून होळीची गाणी गायली जातात आणि लोक घरोघरी रंगतात- दार. आहे.  असे मानले जाते की होळीच्या दिवशी लोक जुने कटुता विसरतात आणि मिठी मारतात आणि पुन्हा मित्र बनतात.  एकमेकांना रंगवण्याची आणि गाणी वाजवण्याची फेरी दुपारपर्यंत चालते.  यानंतर आंघोळ करून, विश्रांती घेतल्यानंतर, नवीन कपडे परिधान करून, लोक संध्याकाळी एकमेकांच्या घरी जातात, मिठी मारतात आणि मिठाई खातात.

Thursday, March 17, 2022

द काश्मिर फाईल्स



काश्मिर फाईल्स या चित्रपटाबद्दल दिवसाला सरासरी पाच पोस्ट तर नक्की वाचल्या असतील. खरंतर विवेक रंजन अग्निहोत्रीचा बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम आणि द ताश्कंत फाईल्स बघितल्यानंतर बॉलिवूडच्या चौकटी लांघणारा हा दिग्दर्शक आहे, आणि दिग्दर्शकाच्याही पलीकडे त्याचा काहीतरी वेगळा दृष्टिकोन आहे, सिनेमा हे माध्यम हाताळण्याची त्याची हातोटी वेगळी आहे याची खात्री पटली होती आणि त्यामुळेच काश्मिर फाईल्स या चित्रपटाबद्दल कुतूहल होतं. 

भ्रमंती हा आपला आवडीचा छंद असल्याने १५ मे २०१८ रोजी काश्मीर फिरण्याचा योग आला. निसर्ग संपन्न असलेला हा परिसर प्रत्येकालाच  खुणवतो. इथला इतिहास अंगावर शहारे आणतो. काश्मीर ही सर्वांची अस्मिता आहे.  अन्य राज्यांच्या तुलनेत काश्मीर हे शब्द जरी ऐकले आपलं देश प्रेम उफाळून येते. यावेळी काश्मीर मधील मराठी प्रशासकीय सेवेतील अधिकारी सागर डोईफोडे यांच्या घरी जाण्याचा योग आला. त्यांनी त्या ठिकाणी केलेला पाहुणचार आजही स्मरणात आहे. 


त्यावेळी आपला मराठी प्रशासकीय अधिकारी काश्मीरकडे कोणत्या नजरेने पाहतात.. हे पत्रकार म्हणून निरीक्षण केले. मला निसर्गसंपन्न वाटणारा काश्मीर त्यादिवशी तेथील विकास, इतिहास, रूढी परंपरा, तेथील परिस्थिती पाहता वेगळा समोर आला. भारतीय सैनिकांनी दिलेला कडेकोट बंदोबस्त तेथील इतिहासात आपल्याला घेऊन जातो.  नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या द काश्मीर फायल्सने पुन्हा एकदा इतिहासाकडे नेले. गुलमर्गच्या व्हॅलीमध्ये घोड्यावर बसून जात असताना घोड्याचा पाय घसरला. 

मी एका साईटला पडलो. खूप घाबरलो होतो. मात्र सुदैवाने कोणतीही वाईट घटना घडली नाही. आजही ती घटना आठवली तरी अंगावर शहारे येतात. आम्ही घोड्यावर बसून बर्फवृष्टी पाहायला आम्ही चाललो होतो.  त्यानंतर  काही दिवसांनी गुलमर्गमधील याच महादेवाच्या मंदिरात आपले पाच आमदार जाणार होते.  श्रीनगर रस्त्यावरून  जाताना बाॅम्बस्फोट झाला. सुदैवाने सर्वजण बचावले. या मंदिरात जय जय शिवशंकर या गाण्याचे शुटिंग झाले आहे.

१९/२० जानेवारी १९९० उगवलेच नसते तर बरं झालं असतं असं वाटावं इतकी नृशंस कत्तल हिंदूंची झाली आणि उर्वरित देशाने ती मूकपणे पाहिली. काश्मीर खोऱ्यातल्या हिंदूंचे अस्तित्व पुसण्याचा आणि पुरोगामी फाईलींमधे बंद करून टाकलेला हा रक्तरंजित इतिहास ,आज बत्तीस वर्षांनी देशासमोर ठेवला गेलाय. ज्ञानाची गंगोत्री असलेलं, विद्येचं शक्तिपीठ असलेलं काश्मीर वामपंथी इकोसिस्टीमने पद्धतशीरपणे हिरवं रंगवून देशापासून तोडलेलं राहील याची काळजी कशी घेतली हे चित्रपट पाहताना जाणवतं आणि प्रचंड राग राग होतो. “फ्री कश्मीर”, “आजादी”, “अफझल हम शर्मिंदा है ” म्हणणारी लालहिरवी पिलावळ कशी पोसली जाते हेही या चित्रपटाने पुन्हा एकदा दाखवून दिलंय.

या दहशतवादी प्रयत्नांना पाठिंबा देणारी इनव्हिजीबल आर्मी म्हणजे लुटीयन मिडीया, भारताच्या सेनेचं मनोबल खच्ची करणारी तेव्हाची शासनसंस्था, किडामुंग्यांपेक्षाही वाइट पद्धतीने मारले गेलेले काश्मीरी पंडित मोठ्या पडद्यावर बघताना अंगाचा थरकाप उडतो आणि डोळ्यातून पाणी ओघळतं. वर्षानुवर्ष मागच्या सरकारांनी विविध फाईल्समधे दडवलेलं हे भीषण सत्य, वास्तवात घडून गेलेलं क्रौर्य आपल्यासमोर ठेवताना अग्निहोत्रीने ताश्कंद फाईल्सप्रमाणेच फुलप्रुफ काम केलंय. 

आज जेएनयू सारख्या संस्थांमधून देशविरोधी विखार,फुत्कार कसे जोपासले जातात आणि तथाकथित बुद्धिवादी प्राध्यापक मंडळी त्याला खतपाणी कशी घालतात हेही ठळकपणे जाणवतं. वर्षानुवर्षे याच तथाकथित उदारमतवादी बुद्धिवादी लोकांनी काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराबद्दल न बोलणं अथवा खोट्या कथा पसरवण्याचं काम केलं. म्हणूनच “जब तक सच जुते पहनता है, तब तक झूट नंगे पाँव गाव घुम आता है” याचा प्रत्यय आपल्याला काश्मीर प्रकरणात आलेला आहे.

एकीकडे काश्मिर ही एक जखम आहे म्हणत असताना तेच काश्मिर पृथ्वीवरचं नंदनवन आहे, स्वर्ग आहे, सौंदर्य आणि निसर्गाच्या चमत्कृतींचा भव्य असा देखावा आहे हे ही ऐकत मी मोठी झाले. त्यामुळे पहिल्यापासूनच काश्मिर बद्दल एक अगम्य गूढ आणि अनामिक ओढ अशा दोन्ही भावना मनात होत्या. 

 दिगंबर दराडे
18 मार्च  2022
पुणे