Sunday, April 2, 2023

“ धंगेकर पॅटर्न “ राज्याला दिशा देणार ?

https://drive.google.com/uc?export=view&id=1BEuLTIGS4VJfm309u-sIVIpRLQU5eZ6q

दिगंबर दराडे
 पुण्यात कसबा पोटनिवडणुकीच्या निकाल जाहीर झाला असून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. पुण्यात कसबाची पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. भाजपने टिळक वाड्याला नाकारून नवीन उमेदवार मैदानात उतरला. त्यामुळे सुरवातीपासून भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटले होते. अखेर ही नाराजी भाजपला महागात पडली आहे. एवढंच नाहीतर गिरीश बापट यांनीही नाराजी दर्शवत प्रचारापासून दूर राहिले होते. भाजपमधील अंतर्गत नाराजी अखेरीस भाजपच्या पथ्यावर पडली आहे. रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11 हजार 40 मतांनी विजय मिळवला आहे. धंगेकर यांच्या बाजूने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जोरदार प्रचार केला होता. आदित्य ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांनीही प्रचार केला होता. 

महाविकास आघाडीने एकीचे बळ दाखवून पूर्ण ताकदीने प्रचार केला. अखेरीस महाविकास आघाडीची मेहनत कामी आली आहे. पोट निवडणूकीत भाजपाला पराभव कसब्यात दुसर्‍यांदा सहन करावा लागत आहे. 1992 मध्ये कसब्यात पोट निवडणूक झाली होती. यावेळी अण्णा जोशी यांना खासदारकीची उमेदवारी दिल्यानंतर कसब्याची निवडणूक लागली होती. यावेळी काँग्रेसकडून वसंत थोरात यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी थोरात यांनी सध्याचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा पराभव केला होता. यामुळे पुन्हा या निवडणूकीची पुनरावृत्ती झाल्याचे बोले जात आहे. भाजप उमेदवाराच्या विजयासाठी खुद्द एकनाथ शिंदेंनी प्रचार सभा घेतल्या होत्या. पण पुणेकरांनी नॉट ओके म्हणत भाजपला पराभूत केलं आहे.
https://drive.google.com/uc?export=view&id=1cLV8ZYtQnB_w61jbyblE-u0kmDpP2RQZ
बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी झाले आहे. पोस्टल मतदानामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. मतमोजणीपासून धंगेकर यांनी आता 11 हजार 40 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. कसबा पेठ हा आतापर्यंत भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. या सर्व भागात ब्राह्मण मतदार हा भाजपला मतदान करत होता. तसेच या भागात सर्वाधिक लोकसंख्या ही मागासवर्गीय मतदारांची होती. 

तरीही भाजपनं सतत या भागात ब्राह्मण उमेदवार दिला होता. माजी दिवंगत आमदार मुक्त टिळक यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक लागली. मात्र यंदा भाजपनं इथे ब्राह्मण उमेदवार दिला नाही. तसंच मुक्त टिळक यांच्या घराण्यातूनही कोणाला उमेदवारी देण्यात आली नाही त्यामुळे कुठे तरी कसब्यातील ब्राह्मण मतदार नाराज होते की काय अशी चर्चा होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाला. कसब्यातील मुख्य लढत ही प्रामुख्यानं भाजप आणि महाविकास आघाडीतील नसून ही लढत भात आणि रवींद्र धंगेकर यांच्यातीलच होती असे म्हणावं लागेल. कारण भाजपने निवडणुकीआधी पैसे वाटल्याचे आरोप करण्यात आले होते. हा मुद्दा धंगेकरांनी उचलून धरला होता. यामुळेही कुठे तरी भाजपवर मतदार नाराज होता अशी शक्यता नाकारण्यात येत नाही.

एकूणच काय तर धंगेकरांनी भाजपला धक्का देत विधानसभेत महाविकास आघाडीचा एक आमदार वाढवला आहे. आता भाजप यावर निश्चित आत्मचिंतन करेलच पण मतदार हाच राजा असतो हे या निवडणुकीच्या निकालांमधून स्पष्ट झालं आहे. भाजपनं प्रचारासाठी खासदार गिरीश बापट यांना उतरवलं होतं. पण गिरीश बापट हे आजारी असल्यामुळे अक्षरशः आजरी अवस्थेत प्रचारसभेला उपस्थित राहिले होते. कदाचित हे मतदारांना आवडलं नसावं. भाजपनं कसबापेठ निवडणूक जिंकण्यासाठी प्रचंड मोठी फिल्डिंग लावली होती. अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पुण्याला भेट देऊन काही प्रमाणात प्रचाराचेच संकेत दिले होते. मात्र सर्व जोर लावूनही नाराज मतदारांना आपल्याकडे ओढुन घेण्यात भाजपला यश आलं नाही.


मनसेनं या निवडणुकीमध्ये उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला होता. ज्या ठिकाणी एखाद्या आमदाराचं निधन होतं, अशा ठिकाणी उमेदवार देणार नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. एवढंच नाहीतर अंधेरी पोटनिवडणुकीप्रमाणे कसबा निवडणुकीसाठी बिनविरोध निवडणूक करण्यासाठी पत्र सुद्धा लिहिले होते. पण, महाविकास आघाडीने उमेदवार उतरवल्यानंतर मनसेनं भाजपला पाठिंबा जाहीर केला. पुण्यात मनसेची ताकद तशी चांगलीच होती. पण, राज ठाकरेंच्या बदलत्या निर्णयाचा मनसेला फटका बसला. मनसेचे सैनिक सुद्धा भाजपल्या मदतीला धावून आले होते पण त्यांची मेहनत वाया गेली आहे.

2 comments: