युक्रेन हा अतिशय छोटा देश आहे. मात्र येथील नागरिकांच्या अंगामध्ये असलेला चिवटपणा खूप वेगळा आहे. युक्रेनला भेट दिल्यानंतर तेथील संस्कृती, शिक्षणाबद्दलची जागृती आणि आपल्या देशाबद्दलची अस्मिता खूप वेगळी आहे हे दिसून येते. अन्य देशांच्या तुलनेत युक्रेनमधील कायदे देखील खूप कडक आहेत. प्रवासाच्या दरम्यान घडलेला एक किस्सा आपणास सांगतो. कीवच्या एअरपोर्टला आम्ही उतरल्यानंतर परदेश नागरिक फोटो काढत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कीवचा एअरपोर्ट खुप सुंदर आहे. याठिकाणी प्रत्येकाचाच फोटो काढण्याचा मोह होतो. मात्र परदेशी नागरिक फोटो काढत असल्याचे युक्रेन पोलिसाला आवडले नाही.
फोटो काढत असल्याचे पाहून पोलीस परदेशी नागरिकांपर्यंत आले. का काढले असा त्यांनी प्रश्न विचारला. त्या पोलिस अधिकाऱ्याला ते आवडलं नव्हते. त्यांच्या कायदात देखील ते बसत नव्हतं. पोलिसांनी एअरपोर्टवर एक रिंगण आखले त्यामध्ये परदेशी नागरिकांना बसवण्यात आले. त्या ठिकाणाहूनच युक्रेन पोलिसांनी त्या परदेशी नागरिकांना मायदेशी पाठवलं. त्यावेळी त्या नागरिकांनी खूप विनंती केली. त्यांच्या देशातीलमध्ये असलेल्या नागरिकांनी देखील त्यांना युक्रेनमध्ये घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र पोलीस काही झुकले नाहीत. ते त्यांच्या मतावर ठाम राहिले. हा प्रसंग माझ्या डोळ्यांनी युक्रेनमध्ये पाहत असताना अंगावर शहारे आले. तेव्हापासून कधीही कोणत्या एअरपोर्टवर फोटो न काढण्याची शिकवण घेतली. त्याच वेळी युक्रेनवाले झुकनेवाले मे नही है हे स्पष्टपणे जाणवले. आणि त्याचा प्रत्यय सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धामध्ये दिसून येत आहे. युक्रेनचे राष्ट्रपती त्यांनी देखील आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. छोटा देश रशियावर तुटून पडताना दिसत आहेत हे त्यांचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की.... त्यांचा जन्म 25 जानेवारी 1978 रोजी तत्कालीन सोव्हिएत युनियन शहरात क्रिव्ही रिह येथे झाला.
हे शहर सध्या युक्रेनचा भाग आहे. झेलेन्स्कीचे पालक ज्यू होते. लहानपणी, झेलेन्स्कीचे कुटुंब मंगोलियातील एर्डेनेट येथे राहायला गेले. या कारणास्तव व्होलोडिमिर झेलेन्स्कीचे प्रारंभिक शिक्षण मंगोलियामध्ये झाले. असे असूनही त्याने युक्रेनियन आणि रशियन भाषेवर आपली पकड कायम ठेवली. मोठा झाल्यावर, तो युक्रेनला परतला आणि 1995 मध्ये कीव नॅशनल इकॉनॉमिक युनिव्हर्सिटीमधून कायद्याची पदवी घेतली. असे असूनही, झेलेन्स्कीने कॉमेडी क्षेत्रात आपली कारकीर्द घडवली. त्याच्या अभ्यासादरम्यान, झेलेन्स्कीला थिएटरचे खूप आकर्षण होते.
1997 मध्ये तो परफॉर्मन्स ग्रुप, क्वार्टल 95, KVN च्या फिल्ममध्ये दिसला. सुरुवातीला शिक्षण पूर्ण केल्यानंतर वोलोदिमीर जेलेंस्की यांना इजराइलमध्ये अभ्यास करण्याकरता स्कॉलरशिप मिळाली परंतु वडिलांची परवानगी न मिळाल्या कारणामुळे वोलोदिमीर यांनी कीव येथून आपले शिक्षण पूर्ण केले. 2000 मध्ये कीव नेशनल इकोनॉमिक यूनिवर्सिटीद्वारे लॉची डिग्री प्राप्त करून आपले ग्रेजुएशन पूर्ण केले. 73 % मतं मिळवून बनले राष्ट्रपती : 2018 मध्ये वोलोदिमीर यांनी राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. वोलोदिमीर यांनी ‘सर्वेंट ऑफ द पीपल पार्टी’ बनवली.या पक्षातून त्यांनी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवली. निवडणुकीत 73 % वोट मिळवून त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि देशाचे राष्ट्रपती पद भूषविले. रशियाविरुद्ध लढत असताना. ते खूप भावूक झाले. मात्र स्वतः शस्त्र हातात घेऊन आपल्या देशासाठी आपल्या अस्तित्वासाठी त्यांनी लढण्याची तयारी केली.
Digambar Darade
(3 मार्च २०२२)
Pune
https://www.blogger.com › ...
User Profile: Digambar Darade - Blogger.com
You are superb sir.. excellent study as well as observation...Hats off
ReplyDeleteThx sir
Deleteछान
ReplyDeleteThx sir ji
Delete