Sunday, March 20, 2022

उजनीच्या भेटीला ''दो परदेशी''



मुबलक पाणी, जमिनीची सुपीकता यामुळे  उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेती बहरली आहे. मुख्य म्हणजे उजनी धरण व या धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी आणि पक्षी पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. यामुळे या क्षेत्रात अनेक कृषि पर्यटन केंद्र विकसित होत आहेत. आपण जेव्हा दुसऱ्या देशांमध्ये जातो. त्यावेळी आपल्या देशा विषयी आणखी अस्मिता जागी होते.

 डब्लिंगचे मित्र काहील यांच्याबरोबर रविवारी सकाळी उजनी चे पर्यटन केले. लहानपणापासूनच ...उजनी पहात आल्यामुळे फारसं आकर्षण मला असण्याचे काही कारण नाही. मात्र परदेशी पाहुण्यांना त्या ठिकाणी परदेशी पक्ष्यांचे दर्शन झाल्यामुळे त्यांना मनापासून आनंद झाला. तो आनंद पाहण्यासारखा होता. शाळेतील मित्र संतोष देवकाते यांनी या ठिकाणी उजनी या नावाने हॉटेल सुरू केले आहे. उजनीची भ्रमंती झाल्यावर उजनीतील मासे उजनीमध्ये खाण्यामध्ये वेगळी मजा आली.

 बहुतांश पक्षी रशियन सैबेरिया, काही पक्षी हिमालय, पूर्व युरोप आणि आफ्रिकेतून येतात. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातल्या भीमानगर (ता. माढा) या गावाजवळ आहे. या धरणाचे पाणी पुढे कर्नाटक राज्यामध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते. उजनी हे महाराष्ट्रातील जायकवाडी धरणानंतर सर्वात मोठे धरण आहे. सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील अर्थकारण व राजकारण यावर अवलंबून आहे. 

उजनी धरणाच्या माध्यमातून सुमारे २५००० कोटी रूपयाची उलाढाल होते. पर्यटनाच्या बाबतीत महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे दरवर्षी आवर्जून येणारे देश विदेशी हजारो पक्षी. यामुळे उजनी बॅकवॉटर जलाशय हा पाणपक्ष्यांसाठी देशात प्रसिद्ध पावत आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून या बॅक वॉटरच्या क्षेत्रात काही पर्यटन केंद्र विकसीत होत आहेत. 

उजनी धरण हे पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यास वरदायिनी ठरले असून या धरणावर परिसराचे विकास, अर्थ तसेच राजकारण अवलंबून आहे. धरणातील पाण्यावर ४४ सहकारी व खाजगी साखर कारखाने, १५ औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपूरक उद्योग अवलंबून असून, दरवर्षी ३० हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम बनला असून कृषि धवल औद्योगिक क्रांती झाली आहे.

 धरण क्षेत्र संरक्षित ठेवून इतर परिसर पर्यटन केंद्रम्हणून नियोजनबद्ध पद्धतीने विकसित करणे गरजेचे आहे. धरणाला लागून पुणे सोलापूर, जलाशयास समांतर टेम्भुर्णी ते नगर राष्ट्रीय महामार्ग, दक्षिण व उत्तर भारताला जोडणारी रेल्वे वाहतूक जेऊर, कुर्डुवाडी व भिगवण स्टेशन मार्गे आहे.  पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, जेजुरी, मोरगाव, दहिगाव, नरसिंहपूर या तिर्थक्षेत्रास दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. उजनी फुगवट्यावर क्रौंच, रोहित, बदके आदी ३५० प्रकारचे पक्षी, चिलापी, रोहू, कटला, वाम, मरळ आदी १५ प्रकारचे मासे यासह विविध पक्ष्यांचे वास्तव्य असते. यातील बहुतांश पक्षी रशियन सैबेरिया, काही पक्षी हिमालय, पूर्व युरोप आणि आफ्रिकेतून येतात.

उजनी माश्यांचा ब्रँड महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगाल येथे निर्माण झाला असून भिगवण, इंदापूर ही ठिकाणे मत्स्य केंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. उजनी पट्ट्यात मत्स्य अभ्यास,पक्षी निरीक्षण, वनस्पती अभ्यास केंद्र, प्राणी संग्रहालय, खाद्यमॉल उभारून पर्यटकांना आकर्षित करणे शक्य असून त्यातून रोजगार निर्मिती होऊन अर्थकारण देखील मजबूत होऊ शकते. मात्र परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच त्यांच्या शेती व्यवसायास धक्का न लावता पर्यटनकेंद्र विकसितझाल्यास देश परदेशातील पर्यटक या परिसराला भेटी देतील मात्र त्यासाठी नेत्यांची जबरदस्त इच्छा शक्ती हवी.

स्थानिकांना रोजगार मिळेल... उजनी जलाशयावर वर्षभर वेगवेगळ्या खंडातून पक्षी येत असतात. यामुळेदेखील पर्यटन व्यवसाय वाढेल, तसेच राष्ट्रीय महामार्गावर उजनी धरण    असल्याने हॉटेलिंग व्यवसायही निसर्गरम्य वातावरणात नावारूपाला येईल. रोजगारात वाढ होईल व संबंधित विभागाला पर्यटनाच्या माध्यमातून महसूल गोळा होईल, असे उजनी हॉटेलचे मालक संतोष देवकाते यांनी सांगितले यांनी सांगितले

. तर रोजगारनिर्मिती व्हावी, गर्दी वाढावी, खाजगी उद्योग आणि रोजगार यांचा ताळमेळ घालून उजनी परिसराचा विकास झाला पाहिजे त्यासाठी उजनी धरणावरील पर्यटन क्षेत्राला लवकरात लवकर डेव्हलप करणे गरजेचे बोट व्यवसायिक सचिन देवकाते यांनी सांगितले.

दिगंबर दराडे
पुणे  21मार्च 2022

8 comments: