प्रत्येक शहराची एक खाण्याची संस्कृती असते. तशी संस्कृती दिल्लीची देखील आहे. यमुनेच्या पाण्याची चव खाद्यसंस्कृती मध्ये पाहायला मिळते. दिल्लीमध्ये अनेक वेळा येणं-जाणं सुरू असतं. देशाची राजधानी दिल्ली आपले वेगळेपण सदैव असल्याचे चित्र पाहायला मिळते. महाराष्ट्र सदनच्या थाळी पासून ते कॅनॉट प्लेसच्या Sandoz पर्यंत, National पासून ते राजेंद्र दा धाबा ते बंगाली मार्केटपर्यंत, प्रेम ढाबा या ढाब्याचे बटर चिकन खूप प्रसिध्द आहे.
इथले जेवण चविष्ट तसेच स्वस्त आहे आणि तुम्हाला इथे बसून खाण्याची सोयही मिळेल. विशेष बाब म्हणजे ते नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच आहे.राजिंदर दा ढाबा हे दिल्लीतील सर्वात जुन्या रेस्टॉरंटपैकी एक मानले जाते. त्याची नॉनव्हेज टेस्ट फक्त दिल्लीतच नाही तर भारताच्या अनेक भागात प्रसिद्ध आहे. तुम्हाला इथले बटर चिकन आवडेल. यासोबतच तुम्ही या ठिकाणी चिकन आणि मटणाचे इतर चविष्ट पदार्थ देखील ट्राय करू शकता.
गुलाटी रेस्टॉरंट हे दिल्लीच्या पंडारा रोड मार्केटमध्ये असलेल्या गुलाटी रेस्टॉरंटच्या बटर चिकनची गोष्ट खास आहे. असं म्हणतात की हे दुकान 1959 पासून सुरू आहे. येथील बटर चिकन खास असते. दरियागंज नाॅनव्हेडसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे अशी अनेक रेस्टॉरंट्स आहेत, जिथे तुम्ही बटर चिकनचा आस्वाद घेऊ शकता. हे ठिकाण राजेशाही थाटासाठीही ओळखले जाते.
दिल्लीच्या राजौरी गार्डन भागात 'ढाबा' हे एक खास रेस्टॉरंट आहे. तुम्ही इथे बटर चिकन आणि गार्लिक नॉन-टेस्ट देसी स्टाईलमध्ये ट्राय करू शकता. इथलं जेवण थोडं महाग आहे, पण चवीच्या बाबतीत या रेस्टॉरंट जोड नाही.
दिल्ली हाटमध्ये साबुदाणा वडा छान आहे, पण सोबत लसणीची चटणी देतात. बटाटेवडा पण ओके. बाकी थालपीठ, भाकरी, झुणका वैगरे तिथे खावं वाटलं नाही. कोकम सरबत मिळतं तिथे, ते मात्र ब्येस्ट. बाकी आंध्राभवन मधले जेवण छान असते. व्हेज थाली मस्त आहे तिथली.. सोबत मेतकुटाचा भाऊ शोभेल असा एक पदार्थ येतो,
नॉन व्हेज खात असाल तर तिथली चिकन चेट्टिनाड ही डीश खाच. जेवण झाल्यावर मस्त पान वैगरे मिळते. गुजराथी थाळीसाठी राजधानी, कॅनॉट प्लेस अन गुडगावमध्ये आहे..
बहुतेक नोयडा मध्ये पण असेल. चांगलं जेवण अन चांगली सर्विस... अशीच एक सुरुची नावाची जागा आहे करोलबागमध्ये, तिथे गुजराथी अन राजस्थानी जेवण मिळतं... एकदम छान चव.. आहे. याव्यतिरिक्त रात्री बेरात्री उशिरा जेवायचं असेल तर पंडारा रोड चांगली जागा आहे. कढी चावल / राजमा चावल साठी कॅनॉट प्लेसवर रोडवर काके का ढाबा टाइपच्या एक्-दोन जागा आहेत. त्या पण चांगल्या आहेत.
दिगंबर दराडे
Very nice information sir... definitely I will visit the place..
ReplyDelete