आपण गरिबांची, सर्वसामान्यांची, दलितांची उपेक्षितांची सेवा केली. याच लोकांनी तुम्हाला मोठ केलं. घरात कोणी ग्रामपंचायत सदस्य नसताना देखील आपण देशाचे मंत्री झालात. आपल्या वाट्याला पण खूप संघर्ष आला. तो संघर्ष कितीही लपवला. पचवला तरी तो लपून राहिला नाही. विरोधकांनी आपणास राजकारणातून संपविण्याची भाषा केली. तुमच्या विरुद्ध फौज उभा केली. मात्र जनता हीच तुमची तोफ होती. या तोफेसमोर अनेक जण गारद झाले. ते केवळ तुमच्या कर्तृत्वावर.. आपण विरोधात होता की सत्तेत लोकांना आठवतही नसेल मात्र आपण मोठे होतात. हे सगळ्यांनाच माहिती आहे. साहेब संघर्षाने तुमच्या व्यक्ती महत्वाला एक वेगळी चमक आली होती.
संघर्ष, अडचणी, प्रश्न मुंडेना नवे नाहीत. याच वळणावर आपल्या कन्या पंकजा मुंडे आल्या आहेत. आजच्या दिवशी हा चक्रव्यूह तोडण्याचा आपण सल्ला तर देत नसाल ना! तीन जून केवळ मुंडे कुटुंबसाठी नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वसामान्य माणसासाठी काळा दिवस आहे. लाखांचा पोशिंदा असलेले गोपीनाथ मुंडे साहेब याच दिवशी सर्वांना सोडून गेले. नियती कधी उलटते आणि नशिबाचे पारडे कधी फिरते, हे कोणीही सांगू शकत नाहीत. गोपीनाथ मुंडे यांनी त्याचा पुरता अनुभव घेतला.
मुंडे साहेबांच्या जाण्याचा परिणाम सामान्य माणसाला आजही भोगावा लागत आहे. मात्र त्यांच्या कन्या असलेल्या पंकजा मुंडेना अधिक सोसावा लागणार आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांची तर हानी झालीच आहे पण पक्षासमोर महाप्रश्न उभे राहिले आहेत. यात बहुजन चेहर्यासह जमीनीशी जुळलेल्या या नेत्याच्या जाण्याने झालेली हानी कशी भरणार ते ‘डॅमेज कंट्रोलर’ची भुमिका कोण बजावणार? मुंडे यांना पर्याय कोण? सोशल इंजिनिअरिंग कसे साधणार? या प्रश्नांची उत्तरे भाजपाच्या नेत्यांना शोधावी लागणार आहेत. त्यांनी आयुष्यात नेहमीच संघर्ष केला. काही वेळेस विरोधकांनी त्यांना आव्हान दिले तर बर्याचदा स्वकीयांनीही त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सर्वांना पुरून उरले.
!!! मुंडे साहेब अमर रहे !!! पंकजा मुंडे यांचे निर्णय बरोबर की चुकीचे हे मांडण्याचे व्यासपीठ नाही. मात्र मुंडे साहेबांचे निधनानंतर पंकजा मुंडे यांच्या वाट्याला जे आले आहे. ते अन्य कुणाच्या वाट्याला येऊ नये. आपल्या घरातील महिला साधी भाजी आण्यासाठी मंडईत गेली तरी घरून तिला आपण चार चार वेळा फोन करतो. मात्र याच पंकजाताई साहेबांच्या जाण्यानंतर आपले विश्व सोडून जिद्दीने कामाला लागल्या. पायामध्ये भिंगरी बांधून राज्य भर फिरल्या. संघर्ष यात्रा काढली. त्यांना यश देखील आले. राज्यात सत्ता आली.
एक महिला म्हणून कोणाचा आधार नसताना संघर्ष करणे फार कठीण असते. मात्र लढणे हे मुंडेच्या रक्तात आहे. त्यांची लढाई अन्य कोणाशीही नव्हती तर ती भावाशी होती. आपल्या च माणसाशी लढताना तीव्र वेदना असतात. त्या कोणाला सांगता ही येत नाहीत. अटीतटीच्या या लढतीत एक तर भाऊ जिंकणार किंवा बहिण जिंकणार एवढाच मुद्दा होता.
माध्यमांसाठीही हा चर्चेचा विषय होता. निवडणूकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. या पराभवानंतर पंकजा मुंडे कुठे चुकल्या यावर अनेकांचे गप्पाचे फड सुरु झाले. ओबीसी समाजात फूट पाडण्याचे ही प्रयत्न झाले. याकडे अद्याप तरी पंकजा मुंडे शांतपणे पाहत आहेत. आज महाराष्ट्रात भाजप विरोधी पक्षात आहे विरोधी पक्षात राहून काम करण्याचे तंत्र मुंडे साहेबांनी शिकवलं. हे तंत्र आजच्या भाजपमध्ये दिसत नाही. मुंडे हे एसी केबिनमध्ये बसून निर्णय घेणारे किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून बैठका जिंकणारे नेते नव्हते. तर गावागावांमध्ये जाऊन खेड्यापाड्यांमध्ये जाऊन परिस्थितीचा सामना करणारे नेते होते. अशा नेत्यांची आज भाजपमध्ये वानवा आहे.
लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचा भारतीय जनता पार्टी पक्ष आता राहिलेला नाही. या पक्षातील ध्येयधोरण आता सगळी बदलली आहेत. क्षणाक्षणाला निर्णय घेताना त्यांना मुंडे साहेब आठवत असतील. एखादा माणूस आपल्यात असण्यापेक्षा नसल्याचे अधिक जाणवते. महाराष्ट्रातील ओबीसी समाज आज सैरभैर झाला आहे. त्यांना त्यांच्या हक्काचे नेतृत्व मिळत नसल्याची जाणीव लोकांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर पक्षातील पंकजा यांच्या समाजाच्या एकहाती नेतृत्वाला सुरंग लावण्याचा वारंवार प्रयत्न होत आहे. पाच वर्षांपूर्वी मुंडे यांच्या अकाली निधनामुळे पंकजा मुंडे यांना वारसाहक्कने समाजाच एकहाती नेतृत्व आणि फारसा अनुभव नसताना मंत्रिमंडळात संधी मिळाली जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ या इच्छेने पाच वर्षे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी अंतर्गत स्पर्धेत पंकजा यांची भूमिका कायम वादादीत राहील्या. पंकजाना यांना टाळून अन्य नेत्यांना विधान परिषद दिली असे सांगितले जाते. औरंगाबादचे भागवत कराड यांनाही थेट राज्यसभेवर घेण्यात आले. विधान परिषदेवर उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून कागदपत्रांची जमवाजमव करत असलेल्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसा मुळे वजांरी समुहात पंकजा यांनाच मान्यता असल्याने, इतरांना खासदारकी, आमदारकी देऊन एकहाती नेतृत्वाला सुरूंग लावण्याचा अंतर्गत विरोधकांचा डाव जरी असला तरी तो कदापि यशस्वी होणार नाही. कारण मुंडे संघर्षाने अधिक उजळून निघतात.
--
Regards
Digambar Darade
Mob- 9860305843

sir... Nobody have courage to put correct points like you... You are the face of the truth.. nobody can replace you sir... I saluate to you.....
ReplyDelete2 जून ची रात्र फार अस्वस्थ करते... साहेब..
ReplyDeleteपंकजा मुंडे यांना आधी पक्षांतर्गत संघर्ष करावा लागेल. मतदारसंघात फिरावे लागेल. स्वतः ची ताकद, संघटन वाढवावे लागेल. राजकारण हे रणागण आहे. तेथे नाती नसतात. विरोधकांवर हल्ले करावे लागतील. पक्षांतर्गत विरोधकांवर सुद्धा. राजकारणात थांबला तो संपला. त्यामुळे लढत रहावेच लागेल.
ReplyDeleteज्ञानेश्वर ,bijale
ReplyDeleteपंकजाताई ओ बी सी समाजाचं नेतृत्व आहे त्यानां कोणीही नाकारू शकत नाहीं
ReplyDeleteप्रश्नामध्यील प्रश्न अनुत्तरित आहे
ReplyDeleteसाहेब वारले की मारले
यंत्रनेच्या तळाशी खोल-खोल
प्रश्न राहुन-राहुन फिरतोय गोल-गोल
त्याच काय??????
फिरवतात
संघर्ष संपला नाही. अजून तीव्र झाला आहे.
ReplyDelete