Sunday, April 2, 2023

तुमचं प्रेम लक्षात राहिल …

https://drive.google.com/uc?export=view&id=1sijLsXEck-SGAq_dFv-xyf0ye3nd7aUu



दिगंबर दराडे


मुंडे-महाजनांच्या काळापासून ते फडणवीस बावनकुळेंच्या पर्वापर्यंत गिरीश बापट पक्षवाढीसाठी अविरत झटत राहिलेसामान्य माणसाला आपले वाटणारे तुमच  नेतृत्व होतेविधी मंडळामध्ये पुणेकरांचे प्रश्न आपण सातत्याने मांडत राहिलात

तुमचा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता की नाही माहिती नाही; मात्र तो तुमचा स्वतःचा बालेकिल्ला होता. हे तर पत्रकार म्हणून अनेक वेळा पाहिले


एक मुस्लीम मतदार हज यात्रेला जाण्याच्या आधी तुम्हाला भेटायला आला होता. त्याला तुम्ही आर्थिक मदत केली. एवढेच नव्हे, तर हज यात्रेवरून येताना माझ्यासाठी तिथले पवित्र पाणी आण,  असे सांगितले. त्या मतदाराने तुमच्यासाठी प्रेमाने हजहून पवित्र पाणी आणले. ते तुम्ही आणि वहिनींनी अत्यंत प्रेमाने प्राशन केले. हे करायला फार मोठे मन लागते. जे तुमच्याकडे होतेतुम्ही गेलात म्हणून राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, काँग्रेसचे उल्हासदादा घरचे कुणी गेल्यासारखे ढसाढसा रडले. तुम्ही भाजपचे होतात म्हणून नाही... तर तुम्ही त्यांच्या प्रेमाचे होतात म्हणून... सामान्य माणूस देखील खूप हळहळला.



देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले मी बापटांमुळे निश्चिंत असायचो.. बापटांच्या जाण्याने पुणे लोकसभेची जागा रिक्त झालीच शिवाय पुणे भाजपमध्ये पोकळी निर्माण झालीय. ही पोकळी भरून काढून पुणे भाजपला दिशा देणारं नेतृत्व तयार करण्याचं आव्हान भाजपसमोर असणार आहे.. पण २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीला जेमतेम वर्षभराचा कालावधी शिल्लक असल्याने पुण्यात पोटनिवडणुकीचे बिगुल वाजणार का हा सवाल आहे.



नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी डावलून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. हा निर्णय भाजपच्या अंगलट आल्याचे बोलले जाते. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत भाजपने घेतलेला निर्णयाची पुनरावृत्ती पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत टाळण्यासाठी भाजपची रणनीती काय असणार, हे येत्या काही दिवसातच समजेल.


आपण खऱ्या अर्थाने लोकांचे खासदार होतात . तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळात स्थान, आणि पुण्याचे खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. लोकांसाठी सदैव तत्पर होतात. यासाठी रोज सकाळी .३० वाजता शनिवार पेठेतील त्यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू  व्हायचे. स्वतः कार्यालयात बसून लोकांच्या समस्या जाणून घ्यायचात



सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. प्रत्येक क्षेत्रातील पुणेकरांकडे खासदार गिरीश बापट यांच्या संदर्भातील अशी एक तरी आठवण नक्की आहे. पक्षातील असो वा इतर पक्षातील काम चांगले करणाऱ्या संघटनेला आपण नेहमी प्रोत्साहन दिले


बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. आता भाजप कडे या जागेसाठी कोण हा खूप महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. कसबा पोट निवडणुकीत टिळकांच्या घरी उमेदवारी दिली नाही. याचा फटका भाजप ला बसला अशी चर्चा आहे. पुणे लोकसभेसाठी ही गणिते वेगळी असतील..


कसब्याच्या पराभवा नंतर ही निवडणूक भाजप साठी एक आव्हान असेल. खासदार गिरीश बापट जेव्हा निवडून आले होते तेव्हा बापट लाख मताधिक्याने निवडून आले होते. त्यावेळेचे राजकारण आणि गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. राज्यात माहविकास आघाडीचे सरकार आले. मागच्या निवणुकीला शिवसेना भाजप बरोबर होती. आता मात्र शिवसेना दोन गटात विभागली गेली


आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आहे. मागच्या चार वर्षात विधानसभेच्या दोन जागा भाजाप ने गमावलेल्या आहेत. एक वडगावशेरी आणि दुसरी महाराष्ट्रभर गाजलेली आणि २५ वर्ष भाजपच्या ताब्यात असलेली कसबापुण्यातील ट्रेंड बदलतोय. अशा परिस्थितीत बापट यांच्यासारखे सर्व समावेशक नेतृत्व भाजपने गमावले आहे. त्यामुळे कसाब्याची पुनरावृत्ती पुण्यात लोकसभेत होऊ नये याची भाजपला मोठी काळजी घ्यावी लागणार आहे